संजय खांबेटे: म्हसळा
कोकणातील नागरीकांना ग्रामपातळीवर ग्रामलक्ष्मी उद्योग समुहाच्या ग्रामनिर्माणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीसाठी आणि रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरास रोखण्यासाठी आज मंत्रालयात ग्रामलक्ष्मी उद्योग समुहाच्या प्रकल्पाचे सादरीकरण( Presentation ) श्री विलास पाडावे संस्थापक ग्रामलक्ष्मी उद्योग समुह , यांनी बुधवार दि.१२ डिसेंबर २०१८ रोजी कृषी राज्यमंत्री ना.श्री. सदाभाऊ खोत यांच्या मंत्रालयातील दालनात केले . यावेळी कोकणातील नागरीकांना स्वयंरोजगार मिळावा याकरीता शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री सुनिल तटकरे यानी कोकण, रायगड व श्रीवर्धन मतदार संघातील मोठया प्रमाणात उपलब्ध असणारी प्रगल्भ नैसर्गिक साधन सामुग्री व पर्यटनामुळे सहज शक्य होणारे मार्केट व विक्री व्यवस्थेकडे कृषी राज्यमंत्री ना.श्री.सदाभाऊ खोत यांचे लक्ष केंद्रीत केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. श्री.सदाभाऊ खोत लौकरच खामगांव येथील ग्रामलक्ष्मी उद्योग समुहास प्रकल्प ठिकाणी जाऊन माहीती घेणार असून कोकणातील युवकांना रोजगार मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी माजी मंत्री तथा रा.कॉ.पार्टी राष्ट्रीय सरचिटणीस श्री.सुनिलजी तटकरे , कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.अनिकेतभाई तटकरे, सचिव (कृषी), सचिव (दुग्ध व पशु विभाग), कृषी आयुक्त कोकण विभाग, कृषी उपसंचालक तानाजी पावडे, नाबार्डचे अधिकारी,श्री.सचिन कदम, ग्रामलक्ष्मी उद्योग समुहाचे संस्थापक श्री.विलास पारावे, व श्री.सुधीर चिविलकर, श्री.उदय कटे,श्री.नितेश लांबे,श्री.संजय खापरे हे संचालक उपस्थित होते.
Post a Comment