संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील रा. जि. प. शाळा - सितपाचा कोंड ( चिरगांव सडकेची वाडी ) येथे गेली १८ वर्षे कार्यरत असलेले,उपक्रमशील व प्रभावी नेतृत्व करणारे शिक्षक श्री. राहुल अशोक नाईक यांना दि. २५ डिसेंबर २०१८ रोजी पाली, सुधागड येथे शिक्षक भारती संघटनेतर्फे ' आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत केले. शिक्षक आमदार श्री. कपिलजी पाटिल साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस श्री. सुनिलजी तटकरे साहेब, शिक्षक भारती राज्य अध्यक्ष श्री. बेलसरे सर, इतर मान्यवर व हजारोंच्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. तसेच म्हसळा तालुक्यातून शिक्षक भारतीचे शिलेदार श्री. दिलीप शिंदे सर, श्री. जयसिंग बेटकर सर, श्री. अमित महा- गावकर सर, श्री. संतोष बोतरे सर, सौ. दर्शना पवार मॅडम, आदी मान्यवरही उपस्थित होते.राहुल नाईक यांचा शिक्षण क्षेत्रांत विशेष ठसा आहे.शिक्षक भारती या संघटनेच्या माध्यमातून त्यानी शिक्षकांच्या अनेक समस्याना वाचा फोडली आहे.
शिक्षण क्षेत्रांतील विविध मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment