मुरुड: अमूलकुमार जैन
कोकण कडा मित्र मंडळ रायगड,मुरुड नगरपरिषद,पदमदुर्ग जागर व संवर्धन समिती व मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने पदमदुर्ग जागर या कार्यक्रमात हजारो शिवप्रेमींनी संपूर्ण गड फुलांनी सजवला होता.सदरील गडाची स्वछता व सजावट हजारो हातानी केल्यामुळे गेले कित्येक वर्ष दुर्लक्षित किल्ला अगदी स्वछ व सुंदर बनला होता. गडाची स्वछता नानासाहेब प्रतिष्ठान चे श्रीसदस्य यांनी पदमदुर्ग जागर च्या कार्यक्र्मगोदर केली होती.
श्रीवर्धन हुन आलेली शिवपालखी वाजतगाजत पहाटे गडावर आणली राजपुरीहीत .प्रकाश स्वामी जंगम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख पाहुणे मायनाक भंडारी यांचे वंशज राजू किर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला मुद्रांचा अभिषेख करण्यात आले.मंत्राच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला.सारे वातावरण शिवकालीन झाले होते.हजारो श्रोते पडणारे मंत्र व व्याख्यान अगदी मन लावून ऐकत होते.
नंतर गडपूजन नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते करून शिवप्रतिमेला जलाभिषेख करण्यात आला .व इतिहास अभ्य्साक पराग बद्रिके यांनी शिवरायांची राजनीती व सर्वसमभाव सर्व जातीचे मावळे घेऊन स्वराज्य घडवले ते कसे त्यांच्या व्याखनात सांगितले
इतिहासतज्ज्ञ सचिन करडे यांनी शिवरायांच्या राजनीती बाबत मार्गदर्शन केले शिवरायांनी विरोधातल्या स्वकीयांना स्वराज्यात कसे सामील करून घेतले या चित्तथराक कथा सांगून शिवरायांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड स्वराज्यासाठी कशी लढवली याचे रोमहर्षक वर्णन करून शिवप्रेमीना एक नवा जोश दिला शिवप्रतेमेचे पूजन झाल्यावर ढोलताशयनच्या गजरात गडाच्या सर्व बुरुजावरून शिवपालखी शिवगर्जनेत नेण्यात आले व कोटेश्वरी मातेचे मूलस्थान हे पद्मदुर्ग किल्यात असल्याने त्याचे पूजन राजपुरोहित प्रकाशास्वामी जंगम त्यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्टातून आलेले शिवप्रेमींनी पालखी सोबत विविध शुर्याचे खेळ दानपट्टा ,तलवारबाजी मलखांब ,पारंपरिक गोंधळ सादर करण्यात आला. पदमदुर्ग जागर साठी विविध भागातून हजारोच्या संख्येने शिवप्रेमी दाखल झाले व सकाळ ५वाजल्यापासून किल्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गडावरील गवत व प्लाष्टिक बॉटल ,प्लास्टिक पिशव्या या वस्तू दूर करण्यात येऊन गड स्वच्छ करण्यात आला होता.
या जागर मध्ये मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील नगरसेविका युगा ठाकूर, वंदना खोत, मुरुड शहर शिवसेना अध्यक्ष अशील ठाकूर,बाळकृष्ण गोंजी,कोकण कडा चे अध्यक्ष सुरेश पवार, भिवंडीचे शेखर मामा, दीपक शिंदे, आदेश दांडेकर, संदीप वाघपंजे, कुणाल सतविडकर, अरविंद गायकर, विजय वाणी, आदी लोकांनी सहकार्य केले व सायंकाळी पालखी मुरुड शहरात वाजत गाजत आण्यात आली..
Post a Comment