श्रीवर्धन : संतोष सापते
देशातील सर्व सामान्य व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा विषय क्रिकेट आहे .क्रिकेट वर निस्सीम प्रेम करणारा भारतीय सर्वत्र निदर्शनांस येतो .माझा आवडीचा खेळ क्रिकेट च आहे असे प्रतिपादन अनंत गीते यांनी भगवा चषक स्पर्धेच्या कार्यक्रम प्रसंगी केले .
श्रीवर्धन शहर शिवसेना आयोजित भगवा चषक स्पर्धेच्या कार्यक्रम प्रसंगी खासदार अनंत गीते यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले .मी आगामी विश्व कप स्पर्धेसाठी इंग्लड ला जाणार आहे .मी क्रिकेट च्या प्रत्येक विश्वकप मधील सामने बघण्यासाठी आवर्जून जातो .असे गीते यांनी सांगितले. श्रीवर्धन मधील र ना राऊत विद्यलयाच्या मैदानात तीन दिवशीय चषकाचे आयोजन करण्यात आले .सदर स्पर्धेचे उद्घाटन जुनेद दुस्ते शिवसेना शहर उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले .सदर स्पर्धेच्या समारोप प्रसंगी जुनेद दुस्ते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील शिवसेना सर्वसामान्य व्यक्तीच्या मदती साठी सदैव तत्पर आहे .तसेच शिवसेना हा सामान्य माणसाचा पक्ष आहे असे सांगितले .समारोप प्रसंगी विचार व्यक्त करताना सुजित तांदळेकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अनंत गीते च विजयी ठरणार असे सांगितले .सदर स्पर्धेचे उप विजेते सनी बॉइज ठरले त्यांना रुपये50 हजार बक्षीस देण्यात आले .स्पर्धेचा विजेता संघ फिजा इलेव्हन (माणगाव) संघ ठरला त्यांना रुपये एक लाख बक्षिस देण्यात आले, सुहास पवार मालिकावीर ठरला, उत्कृष्ट गोलनंदाज शुभम जाधव,उत्कृष्ट फलंदाज हितेश चांदोरकर ठरला . समालोचक म्हणून गुड्या जाधव यांनी काम पाहिले .सदर स्पर्धेच्या आयोजनात श्री गणेश मित्र मंडळ दांडा श्रीवर्धन ,जुनेद दुस्ते उपशहर प्रमुख शिवसेना ,सुजित तांदलेकर , संतोष वेशविकर,प्रतोष कोलथरकर,प्रीतम श्रीवर्धनकर (नगरसेवक ) यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Post a Comment