तटकरेच्या खोटारडेपणाला श्रीवर्धनची जनता कंटाळली


संजय खांबेटे :;म्हसळा 
     रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघात सुनिल तटकरेनी स्थानिक लोकांना खोटे सांगण्याच्या सपाटा लावल्यामुळे येथील  जनता कंटाळली आहे. म्हसळा तालुक्यातील काळसूरी गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी भाजपा  सरकारने निधी प्रस्तावित करून ती मंजूर देखील करून घेतली आहे व हे सत्य या विभागातील सर्व जनतेला पूर्वीच माहित आहे.  तरी देखील जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करीत आपणच ही योजना मंजूर केल्याचे सांगून उद्घाटनाचे नाट्य जनतेसमोर करीत आहे.
      आपली सत्ता जाऊन 4 वर्षे लोटली आहे हे तटकरेच्या मनाला पटत नाही परंतु या मतदार संघातील जनता सुज्ञ, सुशिक्षित व विचारवंत असल्यामुळे यांच्या खोटारडेपणाला चांगलीच पारगंत झाली आहे,तरी तटकरेनी आता जनतेला पचेल एवढेच खोटे बोलावे ही माफक अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.
    राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर नळ पाणी योजनेच्या उद्घाटनाला श्रीवर्धनचे  स्थानिक आमदार नसताना काळसुरी येथे श्री.सुनिल तटकरे  उद्घाटन कसे  करू शकतात असाही टोला कोबनाक यानी लावला आहे. श्री.सुनिल. तटकरे आता आमदार नाहीत, खासदार नाहीत, पण पुढे लोकसभा लढवयाची आहे म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचे कामते व राष्ट्रवादी पक्ष  करीत आहेत.  शासकीय नियम, परवानगी सर्व धाब्यावर बसवून फक्त घाई घाईने प्रशासकीय मंजूरी नसताना अशासकीय भूमिपूजन करण्यात आले परंतु देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे त्यामुळे या योजनेचे खरे मानकरी भाजपा आहे हे जनतेला माहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असला खोडसाळपणा थांबवावा असा इशारा कोबनाक यानी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा