कृषी क्रीडा स्पर्धेत श्रीवर्धनचे वर्चस्व


प्रतिनिधी : श्रीवर्धन
कृषी विभागाच्या माध्यमातून उपविभागीयस्तरीय क्रीडा स्पर्धा महाड येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे शुक्रवार ( ता . ७ ) ते रविवार ( दि . ९ ) दरम्यान घेण्यात आल्या . या स्पर्धेत श्रीवर्धनच्या कृषी विभागाने सर्व क्रीडा प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवले . उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ४ वर्षापासून यशवीरित्या या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे . या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट , हॉलिबॉल , कबड़ी या सांघिक खेळांचा तसेच १00 मीटर धावणे , गोळा फेक , बैटमिंटन , लांब उडी , बुद्धिबळ , फनी गेम या वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता . सांघिक खेळामध्ये श्रीवर्धन यी विभागाने पुरुष क्रिकेट व महिला क्रिकेट विजेतेपद व हॉलिबॉलमध्ये उपविजेतेपद मिळवले . तसेच पुरुष क्रिकेटमध्ये मालिका सामनावीर सनी साळवी , उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमोल गाडगे यांनी चमकदार कामगिरी केली . तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये सुभाष घाडगे गोळा फेक प्रथम क्रमांक . अमोल गाडगे १00 मी . धावणे प्रथम क्रमांक , तुषार दवंडे यांचा १00 मी . धावणे द्वितीय क्रमांक , लांब उडी अमोल गाडगे प्रथम क्रमांक , तुषार द्वितीय क्रमांक भाग्यश्री चलकर १00 मी . धावणे प्रथम क्रमांक ( महिला ) व लांब उडी द्वितीय क्रमांक मिळवला . बक्षीस वितरण समारंभ तालुका बिजगुणन केंद्र कोंडीवते येथे ९ डिसेंबर रोजी पार पडले . यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू साळवी तालुका कृषी अधिकारी महाड विजय पांढरे , तालुका कृषी अधिकार पोलादपूर धुमाळ व मंडळ कृषी अधिकारी श्रीवर्धन सुभाष घाडगे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले अध्यक्षीय भाषणामध्ये विष्णू साळवी यांनी सर्व विजेत्यांचे व सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वर्षा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान श्रीवर्धन तालुक्यास देण्यात येत असल्याचे घोषित केले . श्रीवर्धन कृषी विभागाच्या या चमकदार कामगिरीचा सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा