अपघाताची संख्या रोखण्यासाठी जिल्हयात प्रभावी उपाययोजना करणार ; रु १ कोटी २८ लक्ष दंड वसुल : ३१ डिसेंबर पर्यंत करणार कडक कारवाई


संजय खांबेटे , म्हसळा
रायगड जिल्हयांत वाहतुक शाखेकडून प्रभावी कामगीरी सुरु आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाने अद्यापपर्यंत ५१ हजार ९५८ केसेस करुन , १ कोटी २७ लक्ष ९२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे वाहतुक विभागाचे पो.निरीक्षक सुरेश वराडे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

१ जाने २o१८ ते ३० नोव्हें.२०१८ पर्यंतची कारवाई पुढील प्रमाणे
१ ) जानेवारी     ५०७८.      रु १, २१, १५००
२ ) फेब्रुवारी       ३७१६.      रु     ९३, ८००
३ ) मार्च.            ४११०.      रु १, ३३, २७००
४ ) एप्रिल           ५६३६.       रु  १, २९, ५५०
५ ) मे                 ३४३४.       रु    ७२८५००
६ ) जून.              ३४६८.       रु   ७४२२००
७) जुलै                 ५०५१.      रु १,३६,७४००
८) ऑगस्ट.           ५०७३        रु १,२६, ७९००
९ ) संप्टेंबर.           २६४८.      रु   ८१०६००
१०) ऑक्टोबर        ६८९९.      रु  १,६०,५९००
११) नोव्हेंबर.          ५८४५.      रु १,४९, १५००
                              एकूण.     रु १,२७,९२०००

    जिल्ह्यामध्ये  रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असून हे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी व पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांचे सतत मार्गदर्शन व सूचना असतात.
       जिल्ह्यांतील अनेक शहरी भागात नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्या -साठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे  आशा सूचना असतात ,जिल्ह्यात अनेक ठिकाणी विशेषतः शहरी भागात रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होवून अपघात घडतात. यामुळे नगर परिषदा, नगरपालीका, नगरपंचायतीनी शहरांत पार्किंगसाठी विशिष्ट जागा ठरवून देवून रस्त्यांवर होणारे पार्किंग बंद करण्याबाबत वाहतुक शाखेला मदत करावी अशा सूचना संबधीताना वेळोवेळी देण्यात येत आसत्याचे  वाहतुक पो. नी. सुरेश वराडे यानी सांगितले.
    रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत आहे हा विषय सुप्रीम कोर्टाने केंद्रीत करून देशातील विविध राज्ये व केंद्र शासीत प्रदेशातील संबधीत विभागाला अपघात मियमांचे उल्लंघन विषयी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हयात सुद्धा अशाच पद्धतीची मोहीम राबविण्यात येत असते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा