संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरातील शासकीय गुदामात होणारी मालाची वाहतुक ही नागरी सुरक्षेच्या दृष्टीने बंद व्हावी अशी मागणी म्हसळयाचे माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यानी केली आहे. जिल्हाधिकारी रायगड यांना तहसीलदार झळके यांच्या माध्यमातून कांबळे यानी आज निवेदन दिले . यावेळी त्यांचे समवेत संजय खांबेटे, अनंत अंबवले, महेश पवार आदी मान्यवर होते. सन १९६७ च्या दरम्यान बांधलेले गोडाऊन हे त्या वेळी गावाचे बाहेर होते. आता नागरी वस्तीत प्रचंड वाढ झाल्याने गोडाऊन गावांत आले आहे. अरूंद व केवळ ५ टनाचे क्षमतेच्या , घरांना घासून जाणाऱ्या रस्त्यावरून गोडाऊनची सुमारे २० टन धान्याची वाहतुक सुरु असते. त्याच परीसरांत शहरातील प्रा. शाळा, इंग्लीश मिडीयम स्कुल, ५ ते ६ पाळणाघर अशा १ ते १० वर्षांतील विद्यार्थ्याची मोठया प्रमाणात वर्दळ असते . सदर वाहतुकी मुळे नागरी वस्तींत धोका होऊ शकतो.क्षमतेपेक्षा जास्त मालाचे वाहतुकीने रस्त्याची प्रचंड नासधूस होते.
साने आळी, दातार बंगला, श्री धावीर मंदीर परीसरांतून मुले शाळेत नेताना व आणताना गोडाऊनच्या वाहतुकीची फारच भिती वाटते.
-अर्चना भागवत,पालक
Post a Comment