म्हसळा पंचायत समितीमधे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी


म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
  जगाला स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी दि.20 डिसेंबर रोजी म्हसळा पंचायत समिती येथे सभापती छाया म्हात्रे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी म्हसळा पं.समिती सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, सामाजिक कार्यकर्ते अनिल बसवत, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, विस्तार अधिकारी डी.एन.दिघीकर, नरेश विचारे, आर.आर.पवार, डोंगरे, इंदोले, श्री.मोरे, नामदेव ताम्हणकर, यांसह कर्मचारी वर्ग, शिपाई उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांचे विचार सर्व लोकांनी जनमानसात रुजविले पाहिजेत तसेच प्रत्येकाने आपल्या घरी, कार्यालयात साफसफाई ठेऊन स्वच्छता राखली पाहिजे आणि संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा संदेश कृतीत उतरवून विचार आचरणात आणले पाहिजे असे पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा