म्हसळा टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू : टपाल सेवा ठप्प


म्हसळा : वार्ताहर
पोस्ट कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक रायगड यांनी केला आहे . तसेच १८ पासून देशातील २ लाख ७० हजार टपाल कर्मचारी बेमुदत संपाबर गेले आहेत . जयवंत नाक्ती यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे . नाक्ती म्हणाले की , यापूर्वी टपाल कर्मचाऱ्यांनी मे २०१८ मध्ये सलग १६ दिवसांचा संप केला होता . त्यावेळी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते . तसेच कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारशी लागू करण्याचेही आश्वासनांचा विसर पडला आहे टपाल कर्मचायांची फसवणूक करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आता बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही . कमलेश चंद्रा कमिटीने शिफारस केल्याप्रमाणे १२ , २४ , ३६ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शिफारशीप्रमाणे वेतनवाढ द्यावी , ५ लाख रु . पॅज्युएटी द्यावी , पेंशन फंड टीआरसीएच्या १० टक्के कपात करावी , सर्व कर्मचार्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा , ग्रामीण डाकसेवकांना सरकारी सुविधा , सवलती देण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत . या सर्व मागण्या व कमलेश चंद्रा कमिटीच्या शिफारशी लागू झाल्याशिवाय माघार घेणार नाही , असा इशारा नाक्ती यांनी दिला आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा