गोवर रुबेला लसीकरण मोहिम म्हसळ्यात १६ शाळांचा लस घेण्यास नकार


संजय खांबेटे : म्हसळा 


    भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. म्हसळा तालुक्यात  प्रा.आ.केंद्र म्हसळा, मेंदडी व खामगाव यांच्या माध्यमातून 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील ११, ८४८  बालकांना लसीकरणाचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी ६०१० बालकाना लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाचे सूत्रानी सांगितले. आज पर्यंत १३७ शाळांतील ३११९ मुले व २८९१ मुलीना लसीकरण झाले आहे. म्हसळा तालुक्यातील १६ प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळांचे व्यवस्थापकानी गोवर रुबेला लसीकरण करण्यास नकार दिल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले . त्यामध्ये उर्दू व इंग्लीश मिडीयमच्या काही शाळा आहेत.

पुढील शाळा व्यवस्थापन / पालकानी लसीकरणाला दिला नकार.उंडरे (इंग्लीश मिडीयम ), पाभरे , आडी बंदर, इका, अल हसन, गोंडघर , मेंदडी, वारळ, वरवठणे, आंबेत, पांगळोली .( प्रा), पांगळोली( मा),वावे,वावे (इंग्लीश मिडीयम ).


ज्या शाळांतून व्यवस्थापक /पालकां कडून लसीकरणाला नकार  करण्यात आला अशा सर्वाना W. H. O. व सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागा मार्फत गोवर रुबेला लसीकरणाचे फायदे आणि गैरसमजा बाबत प्रबोधन करण्यात येईल.
-डॉ. सूरज तडवी, प्रभारी ता. आ. अधिकारी म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा