श्रीवर्धनमधील मच्छिमार, नौकामालकांना नवीन जीवना बंद नदीची प्रतीक्षा ; अनेक समस्यामूळे मच्छिमार त्रस्त



श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धनमधील मच्छिमांरासाठी अद्ययावत जीवना बंदरावर जेटी नसल्यामुळे येथील मच्छिमारबांधव त्रस्त झाले आहेत . जीवना बंदर येथे मच्छिमारांना अनेक समस्या भेडसावत असून , मच्छिमाबांधव नवीन जेटीच्या प्रतीक्षेत आहे श्रीवर्धन म्हटलं की , लगेच पर्यटकांच्या नजरेसमोर येतो तो म्हणजे श्रीवर्धनचा समुद्रकिनारा , निळयाशार पाण्याच्या लाटांवर डौलणाच्या मच्छिमांराच्या नौका व जीवना बंदरावर होणारा ताज्या मासळीचा लिलाव . हे सर्व पाहण्यासाठी तसेच मासे खरेदी करण्यासाठी राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने श्रीवर्धनमध्ये येत असतात व मनसोक्त आनंद घेत आसतात . त्याचप्रमाणे श्रीवर्धनमध्ये आलेला कोणताही पर्यटक जीवना बंदर येथे आवर्जुन भेट देत असतो . जीवना बंदर या ठिकाणी फार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली प्रवासी जेटी असून पूर्वी मुंबईवरुन तुकारामबोट व जयवंती या दोन बोटी प्रवाशांची वाहतूक करायच्या . मुंबईवरुन सुटल्यावर त्या बोटी अलिबाग , मुरूड , श्रीवर्धन, दाभोळ , रत्नागिरी व गोवा या ठिकाणी प्रवाशाची वाहतूक करायच्या . मुंबईहून आलेल्या या दोन बोटी जीवना बंदर या ठिकाणी खोल पाण्यामध्ये थांबायच्या . त्या बोटीवरुन तराफ्याच्या सहाय्याने प्रवासी जीवना बंदर प्रवासी जेटी या ठिकाणी उतरायच्या . त्यामुळे त्याच्यासाठी बांधण्यात आलेली जेटी असल्याने त्या ठिकाणी मच्छिमारांना व्यवसायाच्या दृष्टीकोनातून ती फार अपुरी पडत आहे श्रीवर्धनमधील मच्छिमारबांधव आपल्या नौका जीवना बंदरावर नांगरुन ठेवत असतात व त्या ठिकाणाहुन मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रावर जातात . मासेमारी करुन आल्यावर पुन्हा जीवना बंदर जेटीवर येत . परंतु या ठिकाणी असणारी जेटी फारच लहान असल्यामुळे मच्छिमारांना अनेक अडचणी सामोरे जावे लागते . मच्छिमार नौकांना लागणारा बर्फ , पाणी , रेशनिंग भत्ता , अनेक साहित्यसामुग्री आणण्यासाठी याच छोट्या असणाऱ्या जीवना बंदर जेटीचा उपयोग करावा लागत असतो . त्याचप्रमाणे मच्छिमांरानी मासेमारी करून आणलेले मासेही लिलाव करण्यासाठी याच बेटीवरून उतरविले जाते . सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे नौकेवर लागणारी जाळीही नौकेवर चढवितांना मच्छिमारांना तारेवरची कसतर करावी लागते . नौकेवरुन जाळी उतरविण्यासाठीही पुरेशी जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी अपुऱ्या जागवेर जाळी ठेवावी लागतो . त्यामुळे मच्छिमारांच्या जाळ्यांचे ढिगच्या ढिग जेटीवर दिसत असतात . या जेटीवर तर शेवाळीचे साम्राज्यही पसरले असून , अनेक वेळा पर्यटक तसेच मच्छिमांराचे पाय घसरुन पडण्याच्या घटना घडल्या आहेत . त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे पर्यटकांना जीवना बंदर जेटीवर मनमुराद आस्वाद येत नाही . जीवना बंदर जेटीवर मच्छिमारांना आवश्यक लागणारे पाणी यासाठी कोणतीही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही . शिवाय मच्छिमार व पर्यटक यांच्यासाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही . अपुरी वीज व्यवस्थेची समस्याही आहे तरी अद्ययावत पध्दतीची नवीन जेटी जीवना बंदर येथे बांधण्यात यावी , येथे मच्छिमारांना लागणार्या पाण्यासाठी टाक्या बसविण्यात याव्यात , वीजेची व्यवस्था असावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाही कराव्यात अशी मच्छिमारांची मागणी असून , मच्छिमार नौकामालक जीवना बंदर जेटीच्या प्रतीक्षेत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा