संजय खांबेटे : म्हसळा
रायगड जिल्ह्यातील पोलीसांच्या प्रत्येक हालचालीवर जिल्हा पोलीस अधिक्षकांची खास नजर रहाणार आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांमार्फत "थर्ड आय" नावाचे अँप विकसीत केले आहे. प्रत्येक पोलीसाच्या अँड्रॉईड फोन मध्ये ते अँप डाऊनलोड करणे आहे, यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी कर्तव्यावर अगर गस्तीवर कुठे , कधी गेलेत याची इत्यंभूत माहीती वरिष्ठांना कळणार आहे.
जिल्हयात पेण, माणगांव, श्रीवर्धन, महाड, कर्जत, अलिबाग, खालापूर, रोहा, या ठीकाणी उप- विभागीय पो. अधिकारी कार्यालय आहेत, तर २७ पोलीस ठाणी आहेत.यामध्ये पोलीस स्टेशन अंर्तगत संवेदनशील व महत्वाचे ठिकाणी ३५९ Q R Code ( गस्तीचे पॉईंट) तयार केले आहेत.
या सर्व पोलीस ठाण्यांतील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अगर पडताळणी करण्यासाठी मौखीक अगर डायरीतील नोंदी हाच आधार पूर्वी होता यावर "थर्ड आय" हे प्रभावी अँप पोलीसांनी विकसीत केले आहे. जी.पी.आर.एस. प्रणालीवर असणारे हे अँप प्रत्येक पोलीसाचे मोबाईल मध्ये आहे. यामुळे ड्युटीवर असणारा प्रत्येक पोलीस हा नेमका कुढे आहे हे जिल्हा अधिक्षकांना कळणार आहे. नाईट राऊंड, बीट मार्शल, गुड मॉर्नीग, दामिनी अशा गस्तीवर जाणाऱ्या पोलीसांनी गाडी नंबर अँपवर टाकल्यावर ही गस्तीची गाडी कुठे जाते यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांची नजर रहाणार आहे. अशा पद्धतीच्या सोयीमुळे अपघात अगर अन्य गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस घटनास्थळी गेल्याचे निश्चित होणार आहे व वरीष्ठ अधिकाऱ्याना संबंधीत घटनेबाबत मार्गदर्शन करता येणार आहे. यामुळे गुन्हाचा तपास गतीमान करण्यासाठी फार चांगला उपयोग होणार आहे.
Post a Comment