विज मीटर मध्ये फेरफार करणाऱ्या 28 ग्राहकांंवर कारवाई ; दोन आठवड्यात वसुल केला रु 8,93,830 लक्ष रुपयांचा दंड.

म्हसळयात विज चोरी करणाऱ्या ग्राहकांचे बिंग उघड,विज मीटर मध्ये फेरफार करणाऱ्या 28 ग्राहकांंवर झाली कारवाई.

विज वितरण कंपनीने वसुल केला रु 8,93,830 लक्ष रुपये दंड.
विजमिटरमध्ये फेरफार करणाऱ्या  टोळीला करणार लक्ष.

संजय खांबेटे : म्हसळा 

सध्याचे जीवनात विज हि अत्यावश्यक आणि गरजेची बाब बनली आहे असे असताना ती तेवढीच महाग ही झाली आहे.किती ही काटकसर केली तरी विजेच्या वापरावर अंकुश न ठेवणारे ग्राहक विजबिल कमी येण्यासाठी विजमिटरमध्ये फेरफार करून चोरी करण्याचा पर्याय शोधतात मात्र विज वितरण कंपनी करित असलेल्या तपासात  विजचोरांंचे पितळ उघडे पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.     

     म्हसळा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती व औद्योगिक वापराचे विज चोरी करून दंड वसूल केला असल्याच्या घटना घडल्या आहेत त्या वरून म्हसळा विज वितरण कंपनीचे भरारी पथक विजचोरी बाबत दक्ष असल्याने माहे 11 ते 23 नोव्हेंबर 2018 रोजी म्हसळा तालुक्यातील 650 विज ग्राहकांचे विज मिटरची तपासणी केली असता त्यातील 28 ग्राहकांनी विजमिटरमध्ये फेरफार करून विजचोरी केल्याचे आढळुन आले आहे. विज चोरी करणाऱ्या या 28 ग्राहकांकडुन एकुण 8 लक्ष 93 हजार 830 रुपये एवढा दंड ठोठावुन तो वसुलही करण्यात आला असल्याचे म्हसळा तालुका विज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता यादव इंगळे यांनी माहिती देताना सांगितले.विज चोरी करणाऱ्यांं मध्ये 27 विजग्राहक घरगुती वापरासाठी आणि एक ग्राहक व्यावसायिक वापर करीत होते,विज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे विजमिटर खोलून सर्किट टाकणे,रिमोट चीफ बसवणे,मीटर बायपास करणे(थेट कनेक्शन)अशा प्रकारचे फेरफार करून विज मीटर 60%ते70%शॉर्ट केल्याचे निदर्शनास आले आहेत. तालुक्यातील म्हसळा शहरात 6,आंबेत 2,मेंदडी 8 आणि पांगळोली 11 विज चोर सापडले.त्यांचे कडून रु 8,31,830 रुपये विज  बिल आणि 62000 हजार रुपये केंद्र शासित (कंपौंडिंग चार्ज)दंड वसूल केला असल्याचे सांगण्यात आले.म्हसळा विज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता यादव इंगळे यांनी सहाय्यक अभियंता धिरज बिराजदार,कनिष्ठ अभियंता सचिन धनावडे यांच्या आणि विज चोरी तपासणी भरारी पथकाचे मदतीने अॅक्कूचेक मशीनचे सहाय्याने विज चोर ग्राहकांचे बिंग उघड केल्याचे सांगितले .म्हसळयातील 28 विज चोर ग्राहकांमध्ये आंबेत येथील एकाच ग्राहकाने 112590 रुपये दंड भरला आहे तर त्या खालोखाल म्हसळा नगरातील ग्राहकांनी 98,80 हजार रुपयांची विज चोरीचा दंड भरला आहे.उप कार्यकारी अभियंता यांनी विज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी कितीही टेक्नॉलॉजी वापरली तरी बिल रिडींग कनेक्शन करताना फेरफार केलेल्या विजमिटरमध्ये संगणकाचे माध्यमातून E असा सिम्बॉल दिसतो तसे असल्यास त्या ग्राहकांच्या मीटरमध्ये काहीतरी फेरफार केला असल्याचा संशय वाटतो आणि तपासात तसे आढळुन आल्यास विजचोरीची रितसर कारवाई करित असल्याचे अभियंता यादव इंगळे माहिती देताना सांगितले. म्हसळा तालुक्यात विजमिटरमध्ये फेरफार करून देणारी  टोळी आहे .  ग्राहक विज बिल कमी येण्यासाठी मोहात पडतात परंतु ही चोरी आता नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधली जात असल्याने विज चोर ग्राहकांचे बिंग फुटते मात्र विज मीटरमध्ये फेरफार करणारे अज्ञात वैज्ञानिक नाव पुढे येत नसल्याने पडद्याआड राहून माया जाळ गोळा करीत आहेत.मिटर मध्ये फेरफार करून देणाऱ्यांच्यावरच पोलीस कारवाई झाली तर विज चोरीवर आळा बसेल अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा