गणेश प्रभाळे दिघी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या मध्यवर्ती शहरातील एसटी शेडचे भूमीपूजन रविवारी ( ता . २३ ) संपन्न झाले . बोलींमधील मनोहर ( मास्तर ) तोडणकर यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मालकीची जागा एसटी स्टेंडसाठी देण्यात आली असून , त्यांच्या या दिलदारीचे कौतुक आहे . त्यांनी दिलेल्या जागेत बस स्थानकाचे नुतनीकरण करून स्थानकाची भव्य इमारत उभी राहण्यास मदत झाली आहे गेली चाळीस वर्षे एसटी स्टेंड हे साध्या शेडमध्ये बांधलेले होते . अनेक वर्षापासून दूवस्थेत होते . बस स्थानकाची मुख्य इमारत , अंतर्गत प्रवाशांची बैठक व्यवस्था , स्थानकातील अधिकारी व कर्मचार्यांसाठी असलेलं दालन आदींचे नुतनीकरण आवश्यक बनले होते . बऱ्याच वर्षांनंतर बोलॅपंचतन एसटी स्थानकाच्या इमारतीचे भाग्य उजळले असून आता ते सुसज्ज इमारतीत असणार आहे त्यामुळे एसटी प्रवाशांना आणखी सुखद अनुभव मिळणार आहे . बोलपंचतन हे श्रीवर्धन तालुक्यातील मुख्य शहर आहे या सर्व पार्श्वभूमीवर जागा मालक तोडणकर कुटुंबिय यांच्याकडे या इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी करण्यात आली . मनोहर ( मास्तर ) तोडणकर यांच्या स्मरणार्थ ही एसटी शेड बांधण्यात आली आहे बोर्लीपंचतनमध्ये बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करून मनोहर ( मास्तर ) तोडणकर यांनी नागरिकांची मोठी समस्या दूर केली . तोडणकर नूतनीकरनासाठी मदतीचा हात दिल्याने या दातृत्वाचे सर्वस्तरातून कौतुक होत राहणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्यामकांत भोकरे यांनी दिली . मनोहर ( मास्तर ) तोडणकर यांनी बसस्थानकासाठी मदत करून समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य केले आहे किंबहुना , बसस्थानक नुतनीकरण करून तोडणकर कुटुंबियांचे दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले असल्याचे वडवली येथील जेष्ठ समाजसेवक बबनराव सुर्वे यांनी सांगितले . याप्रसंगी प्रमुख अतिथी व उघटक म्हणून सरपंच गणेश पाटील तसेच बसस्थानक वास्तूस श्रीफळ दशरथ तोडणकर यांच्या हस्ते वाढवण्यात आला . प्रसंगी श्यामकांत भोकरे , सुकुमार तोडणकर , सुबोध तोडणकर , अबुकलांम जड़े , शब्बीर फकीर शंकर गाणेकर प्रदीप खोपकर , दीपक काळदेवकर दत्तात्रय खोत , दतात्रय पांढरकामे , शब्बीर केंद्रे चंद्रकांत तोडणकर , प्रसाद मुरकर , रविंद्र दिवेकर , विलास तोडणकर , मनोहर परकर , सुधाकर पाटील अनंत किर , मसूद दर्जी , रविंद्र मोरे , नवनीत तोडणकर , गणेश तोडणकर , राकेश शिरवटकर , इकबाल अॅड़े , रत्नाकर तोडणकर , आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीलाधर खोत यांनी केले .


Post a Comment