संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा तालुक्यात गेले १- २ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येते.बहुतेक ठिकाणी पारा १२ ते १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. डिसेंबर महिन्यापासून थंडीचा जोर हळूहळू वाढत आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर थोडा कमी झाला होता. गेले दोन - चार दिवस ढगाळ वातावरण नसल्याने थंडीचा जोर अधिक वाढला आहे. दरम्यान थंडीत वाढ झाल्याने पहाटेच्या वेळी काही प्रमाणात धुके पडत आहे. याचा भाजीपाला आणि आंबा बागायतीना फटका बसण्याचा धोका आहे, असा दावा काही बागायतदारा ना केला. तर या कडाक्याचा थंडीमुळे पिकांवरील रोगराई कमी होईल, असाही दावा बागायतदारानी केला. धुक्यामुळे पिकांवर दव पडत आहे.
थंडीच्या कडाक्याने व दिवसा कमाल तपमानात घट झाल्याने म्हसळाकर गारठले आहेत. सकाळी व सायंकाळी हवामानांत शित लहरींचे प्रमाण हलकसे वाढले आहे . त्यामुळे बाजारांत स्वेटर, ब्लँकेट, मफलर, कान टोप्या सारख्या उबदार कपडयांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आसल्याचे स्थानिक व्यापारी सुरेश शेट जैन यानी सांगितले. शहरांत भाग्यलक्षी क्लॉथ सेंटर, रमेश क्लॉथ सेंटर, दिपचंद सायरमल, दिपक क्लॉथ सेंटर व राजेश एम्पोरियम असे निवडक व चोख मालाचे विक्रेते आहेत. सर्वच दुकानातून मागणी वाढली आहे.
हवामान खात्याचे थंडीचे अंदाजाने यावेळी मोठ्या प्रमाणात व मॅन्यु. दराने खरेदी केली. मागणी व थंडी वाढली तरी बाजारांतील दर स्थिर रहातील.
-रणजीत जैन, रमेश क्लॉथ सेंटरचे मालक


Post a Comment