चांदोरे ग्रामपंचायतीला द्वितीय पारितोषिक



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २0१७ - १८ अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा प्रथम पारितोषिक रु . १0 लाख ग्रामपंचायत कुशेवाडा सिंधुदुर्ग , माणगाव तालुक्यातील चांदोरे ग्रामपचायला ८ लाखाचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे . तर तृतीय पारितोषिक ६ लाख ग्रामपचांयत पावणाई सिंधुदुर्ग , स्व . आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार ( कुटुंब कल्याण ) विशेष पुरस्कार रु . ३0 हजार ग्रामपंचायत नाखरे ता . रत्नागिरी जि . रत्नागिरी , स्व . वसंतराव नाईक पुरस्कार ( पाणी व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन ) विशेष पुरस्कार व रु . ३0 हजार ग्रामपंचायत रोठ बुद्रक तारोहा जि . रायगड , स्व बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ( सामाजिक एकता ) विशेष पुरस्कार रु . ३0 हजार ग्रामपंचायत मांडे ता . पालघर जि . पालघर या ग्रामपंचायतींचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन विभागीय कोकण महसूल आयुक्त डॉ . जगदीश पाटील यांच्या हस्ते भरवण्यात आले संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २0१७ - १८ अंतर्गत कोकण विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कोकणभवन येथे संपन्न झाला . या कार्यक्रमास रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर , पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिलींद बोरीकर , रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल उपायुक्त ( विकास ) भारत भंडगे , उपायुक्त ( आस्थापना ) गणेश चौधरी , सहायक आयुक्त दिपाली देशपांडे आदि उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ( विकास ) भारत भंडगे यांनी केले . त्यांनी या अभियानाचा शासनाचा उद्देश स्पष्ट केला . ते म्हणाले , ग्रामविकासाशी निगडीत एखाद्या क्षेत्रात भरीव काम - ग्रामपंचायतींना करणा या तालुका , जिल्हा , विभाग व राज्यस्तारावर या अभियानांतर्गत विशेष बक्षिसे दिले जातात ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश " ग्रामीण जनतेचे ’ आरोग्यमान उंचावणे हा आहे . कार्यक्रमाचे आभार उपायुक्त ( आस्थापना ) गणेश चौधरी यांनी मानले . . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा