श्रीवर्धन : अपंग मतदारांमध्ये जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम


संतोष सापते : श्रीवर्धन
लोकशाही मूल्यांची जोपासना करत देश विकासाकडे मार्गक्रमण करत आहे देशातील प्रत्येक घटकांचा त्या विकास प्रक्रियेत समावेश अभिप्रेत आहे देशातील अपंगाच्या सेवेसाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तत्पर आहे या अनुषंगाने श्रीवर्धन तहसील कार्यालयात अपंग दिन साजरा करण्यात आला . देशातील प्रत्येक घटकांच्या विकासाठी घटनात्मक बाबीची तरतूद करण्यात आली आहे . सर्वसामान्य माणसाच्या मुलभूत हक्काची पायमल्ली होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे . विकासाच्या मुख्य प्रवाह पासून एक ही व्यक्ती दुर्लक्षित राहणार नाही या साठी सर्वथा प्रयत्न केले पाहिजेत . अपंग व्यक्तीला त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यासाठी प्रयत्नशील असावे . अपंगत्व हा शाप नाही ती निसर्गाची मानव जातीस देणं आहे . त्याचा सामना सर्वांनी मिळून करणे अगत्याचे आहे . आपल्या व्यक्तीस आलेले अपंगत्व किंबहना निसर्गतः मिळालेले अपंगत्व या वर उपाय म्हणजे आपण त्या व्यक्तीस सामाजिक जीवनात दिलेली मोलाची साथ होय . सामाजिक जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा हक्क सर्वांना आहे याच हेतूने या कार्यक्रमातून सामाजिक कार्यं साधता आले . अपंग मतदार जनजागृतीसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल निलेश नाक्ती व बाळू रंजाने यांचा सत्कार करण्यात आला . २४ ऑगस्ट २०१८ रोजी श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील एकूण ३४0 व्यक्तींची अपंगत्व तपासणी करण्यात आली होती . त्यापैकी जागतिक अपंग दिनी एकूण १८ जणांना अपंग प्रमाणपत्र , ३0 व्यक्तींना अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले . या सर्व अपंग व्यक्तींचे संजय गांधी योजनेचे अज़े मंजूर करुन त्यांना प्रतिमाह ६00 रुपए लाभ मिळनार आहे . श्रीवर्धन तालुक्यातील एकूण ४२९ दिव्यांग मतदार यांना मतदार यादीत चिन्हांकित करण्यात आले आहे लोकसभा निवडणुका २०१८ या दिव्यांग मतदारांना सुलभ जाण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत . सदर कार्यक्रमास तहसीलदार जयराज सुर्यवंशी , बीडीओ प्रवीण सिनारे , नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने , पंचायत समिती सभापती मीना गाणेकर , पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक , तहसील कार्यालयातील व प्रताधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा