म्हसळा / आंबेत
जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या स्व माजी मुख्यमंत्री बैं . ए . आर . अंतुले यांच्या आंबेत गावामध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा तथा माजी वेंक्रीय मंत्री शरद पवार यांचे शेकडो कार्यकत्र्याच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले . शरद पवार यांच्या म्हसळा भेटीमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून माजी मुख्यमंत्री स्व . बॅ . ए आर अंतुले यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे श्रीवर्धनचे स्टार प्रचारक नाविद अंतुले यांच्या राजकरणातील प्रवेशानंतर काँग्रेस पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे यानंतर त्यांनी आंबेत ग्रामपंचायत राष्ट्र वादी च्या ताब्यातून घेऊन कॉग्रेसला यश मिळवून दिले . या विजयासाठी त्यानी आघाडीतील राष्ट्रवादीला सोबत न घेता युतीमधील सेनेला . सोबत घेतले होते . नेते युवा नाविद अंतुले सध्या श्रीवर्धन मतदार संघामधे कॉग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत . यासाठी त्यांना मुस्लिम समाज ' ' अनेक युवकांची मोठ्या प्रमाणात साथ असल्याचे दिसते . आंबेत भेटीवरुन उलटसुलट चर्चा सुरु आहे . याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीमधे होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत . आज पवार . काल ( बुधवारी ) श्री . शरद पवार यांनी आंबेतला सदिच्छा भेट दिली . राज्याच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे बैं . अंतुले यांच्या आंबेतमध्ये श्री . पवार यांचे जंगी स्वागत झाले . यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री . सुनील तटकरे आ . अनिकेत तटकरे , प्रदेश चिटणीस अली कौचाली , मुंबईचे उपाध्यक्ष भास्कर विचारे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर , अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजिम हसवारे , जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दिक इनामदार , जिल्हा संघटक भाऊ करडे , तालुकाध्यक्ष समीर बनकर , तालुका उपाध्यक्ष भाई बोरकर , सभापती छाया म्हात्रे उपसभापती संदीप चाचले , म्हसळा नगराध्यक्षा फलकनाझ हुर्जुक उपनगराध्यक्ष संजय कर्णिक , जि . प . सदस्य बबन मनवे पं . स . सदस्य मधुकर गायकर , उज्वला सावंत सामाजिक कार्यकर्ता नवीद ( भाईजान अंतुले शहराध्यक्ष रियाज घराडे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment