बालवयातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली पाहिजे - सभापती छाया म्हात्रे यांचे विद्यार्थ्यांना कानमंत्र



● खरसई येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा पंचायत समिती शिक्षण विभाग, खरसई मराठी शाळा व न्यु इंग्लिश स्कुल खरसई यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम 2018 -19 राजिप मराठी शाळा खरसई येथे दि.04 व 05 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.स.सभापती छायाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
यावेळी विज्ञान प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रयोग सादरीकरण केले होते. वीज बचत, पाणी बचत, सौरऊर्जा, पाण्याची बचत करून वीज निर्मिती, झाडांचे वैज्ञानिक फायदे, विमानांचा शोध, लोहचुंबक वर आधारित यशस्वी प्रयोग, पुस्तकांचे वैज्ञानिक फायदे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयोग दाखवण्यात आले होते.
    यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंचायत समिती सभापती छायाताई म्हात्रे यांनी सांगितले की शाळेत शिक्षण घेत असताना बाळवयातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली पाहिजे तसेच बालमन कोवळे असते त्यामुळे विद्यार्थ्यांची एखादी गोष्ट आत्मसात करण्याची क्षमता जास्त असते म्हणून शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने व स्पर्धात्मक युगात उपयोगी पडणारे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी देखील गुरुजनांच्या शिकवणीचे पालन करून शाळेचे आणि आई वडिलांचे नावलौकिक केले पाहिजे असा मोलाचा कानमंत्र छाया म्हात्रे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच रायगड जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे यांनी विज्ञान ही काळाची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक वेगवेगळे शिक्षण घेऊन नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. 
यावेळी कार्यक्रमाला सभापती छाया म्हात्रे यांच्या समवेत उपसभापती संदिप चाचले, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, सदस्या उज्वला सावंत, सदस्य मधुकर गायकर, वरवठणे गण अध्यक्ष सतिश शिगवण, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, सरपंच महादेव कांबळे, संतोष सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मांदाडकर, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, गट शिक्षणाधिकारी संतोष शेडगे, माजी गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे, 
यांसह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा