पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



संजय खांबेटे : म्हसळा
राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  शुक्रवार दि.21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.21 रोजी सकाळी सहा वा. अलिबाग शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव., सकाळी 11 वा. रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनी लिमिटेड यांच्याकडून पेण, खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अदा केलेल्या मोबदल्याबाबत बैठक, स्थळः राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, दुपारी पाऊण वा. मांडवा- येळवणे ता. अलिबागकडे प्रयाण, दुपारी दीड वा. मांडवा येळवणे येथे आगमन व साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी पावणे तीन वा. मांडवा येळवणे येथून  कर्जतकडे प्रयाण, सायं. सहा वा. कर्जत येथे आगमन व  कर्जत तालुका भाजपा कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन, स्थळ- भाजपा कार्यालय कर्जत (पू), रात्री आठ वा. कर्जत येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा