म्हसळा पंचायत समिती इमारत : ठेकेदाराला बिल मिळत नसल्याने ठोकले कुलुप ; लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा नाही.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
    म्हसळा पंचायत समिती प्रशासकीय  इमारतीचे काम गेले दोन महीने बंद आहे.जिल्हा परिषदेकडून ठेकेदाराला बील मिळाले नसल्याने  ठेकेदाराजवळ काम बंद ठेवण्या व्यतीरीक्त कोणताच पर्याय नसल्याचे समजले.
    रू २ कोटी ४७ लक्ष ५५ हजार किमतीच्या या कामातील सुमारे ९ ० % काम पूर्ण झाले आहे. नवीन इमारतीचे कामात ग्रीन बील्डींग संकल्पना राबविण्यात आली आहे. प्रकाश योजना , वायु विजन , उर्जेच्या वापरांत काटकसर , पर्जन्य जलपुर्न:भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहीत्य व साधन सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. कामाचा दर्जा अतीशय चांगला आहे. अर्धवट स्थितीत काम बंद आसल्याने भविष्यात मात्र अडचणी ठरू शकतात.

पंचायत समिती  व लोकप्रतिनिधी हुतात्मा स्मारकाला विसरले

पंचायत समिती जुन्या इमारतीसमोर  पक्क्या बांधकामाच्या असणाऱ्या मदन आबा सावंत (आंबेत), शंकर आण्णा विचारे ( खामगांव), सखाराम देवजी पाटील (तळवडे), तालुक्यातील या तीन हुतात्मानी देशासाठी विरगती पत्करल्याचे स्मारक असूनही नियोजित इमारतीत यासाठी व वॉल कंपॉऊड साठी कोणतीही तरतूद नाही . पंचायत समितीच्या प्रापर्टी रजिस्टर मध्ये  हुतात्मा स्मारका बाबत कोणतीच नोंद नसल्याचे पुढे येत आहे. हुतात्मा स्मारक  व वॉल कंपॉऊड साठी नव्याने किमान १०ते १५ लक्ष रुपयाची तरतुद असावी 


    " पंचायत राज व्यवस्थेत पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यानी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अंर्तगत सदर इमारतीचा विषय संभातून घेणे आवश्यक असताना पंचायत समिती अगर जिल्हा परिषद सभांतून अगर स्थायी संभातून विषय हाताळलाच नसल्याचे पुढे येत आहे.पंचायत समीती व जिल्हा परीषद सदस्यानी या विषयी गेले दोन वर्ष दुर्लक्ष का केले हा राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे."


     
  हुतात्मा स्मारक  व वॉल कंपॉऊड साठी नव्याने किमान १० ते १५ लक्ष रुपयाची तरतुद असावी अशी मागणी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले दोन वर्ष करीत आहे .
-महादेव पाटील, माजी सभापती , पं.स. म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा