म्हसळा नगरपंचायत कर्मचारी करणार काम बंद आंदोलन ; स्वच्छता -पाणी पुरवठ्याचे वाजणार तीन- तेरा.



संजय खांबेटे: म्हसळा
   शासनाने तालुका मुख्यालयाचे ठीकाणी नगररचना योजना लागू होणे, मुख्यालयाचा नियोजनबध्द विकास होणे या मुख्य  हेतूसाठी राज्यातील तालुका मुख्यालयाचे ठीकाणी लोकसंखेचा निकष आग्रही न घरता राज्यातील १०१ ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर केले. परंतु शासनाने नगरपंचायतीतील कार्यरत कर्मचारी ,सवर्ग कर्मचारी , सफाई कामगार , रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत मागण्या सोडविण्याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने राज्यांतील कर्मचारी शनी. दिं.१५ डिसें. रोजी धरणे आंदोलन व १ जाने २०१९ पासून  बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. या विषयी म्हसळा नगर पंचायतीचे सुधीर म्हात्रे, अशोक सुतार, संतोष कुडेकर, सचिन मोरे, आमिता हाटे अन्य कर्मचारी व  संघटनेने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसीलदार व नगरविकास विभागाला रीतसर कळविले आहे. वर्षाचे शेवटच्या तीन दिवसांत म्हणजे २९, ३०,३१ डिसें .२०१८ रोजी शासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून काम करणार आहेत. जिल्हयात म्हसळा, पोलादपूर,माणगाव, तळा व खालापूर या ५ ठीकाणी नव्याने नगरपंचायती सत्तीत्वात जाने २०१५ पासून अस्तीत्वात आल्या आहेत. 
    म्हसळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर २५ जाने. २०१५ रोजी झाले  आज ४ वर्ष होत आले तरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुमारे १८- १९ कर्मचारी नगरपंचायतीचे ओझे मानसिक ताण- तणावाखाली  वहात आहेत. शासनानी नव्याने अस्तीत्वात आलेल्या नगर पंचायतीसाठी अकृतीबंध करून पद निर्मीती व सहायक अनुदान मंजुर केले आहे. म्हसळा नगर पंचायतीची लोकसंख्या १ ० हजार पेक्षा जास्त आसल्याने २९ पदाना मंजुरी आहे. यासाठी रु ७० लक्ष ३४ हजार ३२८ वार्षिक निधी मंजूर आहे. यामध्ये लिपीक, स्वच्छता निरीक्षक, प्रयोग शाळा सहाय्यक, पंप ऑपरेटर, वायरमन, शिपाई , मुकादम, व्हॉल्व मन या सारख्या २० पदांसाठी व सहा कार्या. अधिक्षक, सहा. मालमत्ता पर्यवेक्षक , सहा. समाज कल्याण माहीती व जनसंपर्क अधिकारी, करनिरीक्षक, लेखा परिक्षक, स्थापत्य अभियंता, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, नगररचनाकार सार्वजनिक बांधकाम अशी ९ पदाना शासनाने मंजुरी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा