संजय खांबेटे : म्हसळा
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विजापडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काही ना अपंगत्व येते. घरातील कर्त्य व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थीती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस त्यांच्या कुटुंबाना आर्थिक लाभ देण्याकरिता " गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना " ही योजना ८ /१२/२०१८ ते ७/१२/२०१९ या १२ महिन्याच्या कालावधी करिता विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाचे कृषी, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतला आहे.
या योजनेमुळे राज्यांतील महसूल विभागाकडे ७/१२ वरील नोंदी प्रमाणे व शासन निर्णया नुसार १०ते ७५ वर्षे या वयोगटातील सुमारे १.३७ कोटी खातेदार शेतकऱ्यांचे वतीने राज्य शासनाने विमा पॉलीसी उतरविली आहे. नुकसान भरपाईची निश्चिती पुढील प्रमाणे आहे.
अ. क्र. अपघाताची बाब नुकसान भरपाई
१) अपघाती मृत्यू रु २ लक्ष
२) अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन
अवयव निकामी होणे रु २ लक्ष
३) अपघातामुळे एक डोळा अथवा एक
अवयव निकामी होणे रु १ लक्ष
Post a Comment