श्रीकांत शेलार श्रीवर्धन
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे हटके स्वागत करण्यासाठी सारे सज्ज होत असताना श्रीवर्धन पोलिसांकडून थर्टी फर्स्टला ‘सेफ्टी फर्स्ट’ म्हणत कंबर कसली. पर्यटकांच्या गर्दीत सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी श्रीवर्धन, दिवेआगर येथे पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
कुटुंबासह व मित्रमैत्रिणींसोबत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे सहजसफरीसाठी पर्यटकांची मांदियाळी पहायला मिळत आहे. घरापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे बेत आखले जातात. त्यासाठी राज्यभरातील पर्यटकांकडून रायगड जिल्ह्याला पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल व लॉज यांचे बुकिंग यापूर्वीच फुल्ल झाले आहे. नववर्षानिमित्त नेहमीपेक्षा जास्त दर आकारण्यात येत आहेत. 22 डिसेंबरपासून श्रीवर्धनमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून येथील समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, गड-किल्ले, थंड हवेची ठिकाणे पर्यटकांनी गजबजली आहेत.
थर्टी फर्स्टच्या रात्री मजा, मस्ती, नाच, धिंगाणा आणि पार्ट्या करण्यासाठी सर्वच हॉटेल सज्ज झाली आहेत. हॉटेलमध्ये विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. गाण्यांच्या तालावर पर्यटकांना बेधुंद होऊन नाचता येणार आहे. पार्ट्यांची जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये कार्यक्रमानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासन सज्जनववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी पार्ट्या रंगतात. मद्य पिऊन गाडी चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करत आहेत. त्यांच्याजवळील साहित्य, परवाने तपासले जात आहेत. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग खबरदारी घेत आहे.

Post a Comment