म्हसळा नगरपंचायत कर्मचारी नवीन वर्षापासून करणार काम बंद आंदोलन ; स्वच्छता -पाणी पुरवठ्याचे वाजणार तीन- तेरा.


संजय खांबेटे : म्हसळा
     शासनाने तालुका मुख्यालयाचे ठीकाणी नगररचना योजना लागू होणे, मुख्यालयाचा नियोजनबध्द विकास होणे या मुख्य  हेतूसाठी राज्यातील तालुका मुख्यालयाचे ठीकाणी लोकसंखेचा निकष आग्रही न घरता राज्यातील १०१ ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर केले. परंतु शासनाने नगरपंचायतीतील कार्यरत कर्मचारी ,सवर्ग कर्मचारी , सफाई कामगार , रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत मागण्या सोडविण्याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने राज्यांतील  नगरपंचायतींचे कर्मचारी नवीन वर्षाचे सुखतीपासून म्हणजे  १ जानेवारी २०१९ पासून कामबंद आंदोलन करणार आहेत.
    म्हसळा नगर पंचायतीचे  कर्मचारी सुधीर म्हात्रे, अशोक सुतार, संतोष कुडेकर, सचिन मोरे, आस्मिता हाटे, प्रशांत करडे , हांनीफ साने, चंद्रकांत उर्फ बंडया वारे व अन्य कर्मचाऱ्यानी शनी. दिं.१५ डिसें. रोजी धरणे आंदोलन, वर्षाचे शेवटच्या तीन दिवसांत म्हणजे २९, ३०,३१ डिसें .२०१८ रोजी शासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून काम अशा पद्धतीने गांधीगीरीने आंदोलन करुनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने उद्यापासून काम बंद आंदोलना सारखा प्रवित्रा घेतला आसल्याचे नगर पंचायत कर्मचारी प्रातिनिधीने सांगितले.
   
       म्हसळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर २५ जाने. २०१५ रोजी झाले  आज ४ वर्ष होत आले तरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुमारे १८- १९ कर्मचारी नगरपंचायतीचे ओझे मानसिक ताण- तणावाखाली  वहात आहेत. शासनानी नव्याने अस्तीत्वात आलेल्या नगर पंचायतीसाठी अकृतीबंध करून पद निर्मीती व सहायक अनुदान मंजुर केले आहे. म्हसळा नगर पंचायतीची लोकसंख्या १ ० हजार पेक्षा जास्त आसल्याने २९ पदाना मंजुरी आहे. 


म्हसळा शहराला कच-याने विळखा घातला आहे, कर्मचाऱ्यांचे संपामुळे चौका चौकात कचऱ्याचे साम्राज्य होईल का ? पाणीपुरवठा सुरु राहील का बंद होईल? आवश्यक असणारे महत्वाचे दाखले कोण देणार? संप काळांत नागरीकानी कशा पद्धतीने शासनाला सहकार्य करायचे याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कोणा जवळ संपर्क साधावा या बाबत मार्गदर्शक सूचना न केल्याने नागरीक मात्र संभ्रमात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा