श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
समाजातील प्रत्येक घटकांचा
विकास व प्रगती साधण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे .आज आधुनिक शिक्षणा मुळे स्त्री सक्षम बनली आहे तिने समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे .इंद्रधनुष्या प्रमाणे आपल्या कर्तृत्वाची उधळण करत सर्व क्षेत्र स्त्रीने हस्तगत केले आहेत .असे प्रतिपादन नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने यांनी एस एन डी टी च्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी केले
महर्षी कर्वे यांच्या अविरत कष्टा मुळे एस एन डी टी महाविद्यलयाची स्थापना झाली .समाजातील उपेक्षित स्त्री घटकास शिक्षण मिळण्यासाठी महर्षी कर्वे यांनी आपले आयुष्य समर्पित केले .व्यक्तीने आयुष्यात समर्पित भावनेने केलेले कार्य निश्चितच यश प्राप्ती करून देते .महात्मा जोतीबा फुले व महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करत स्त्री शिक्षणा साठी अनुकुल वातावरण निर्माण केले .त्याची फलश्रुती आज झाल्याची निदर्शनांस येत आहे . आधुनिक शिक्षण ही काळाची गरज आहे .आज समाजातील स्त्री पुरुष विषमता शिक्षणा मुळे कमी झाली आहे .स्त्री ने समाजात मानाचे स्थान निर्माण केले आहे .चूल व मुलं या पुरते मर्यादित आयुष्य आज काल बाह्य ठरले आहे .सर्व क्षेत्रात स्त्री ने अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे .राजकारण ,शिक्षण, कला ,क्रिडा, सर्वत्र स्त्री अधिकार पदी विराजमान झाली आहे .इंद्रधनुष्या प्रमाणे आसमंत स्त्री कर्तृत्वाने उज्जळून निघाले आहे असे नरेंद्र भुसाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले .
विद्यर्थीनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी एस एन डि टी महाविद्यलया कडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनिनी विविध कला गुणांचे सादरीकरण केले . कार्यक्रमासाठी विनय वैद्य, पदमजा कुलकर्णी काकडे भाऊसाहेब, अर्जुन भगत, योगेश तुरे व डॉ ,मीना कुंटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .महाविद्यलयाचे प्राध्यापक अनिल वाणी, तृप्ती विचारे मॅडम,केदार जोशी ,दिनेश भुसाने, प्रभाकर चौगले ,आकाश सावंत, मनीषा म्हशीलकर, रुपेश गरफडे करिश्मा चौगुले व कुमारी अक्षता तोडणकर यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावली .ध्रुवा पटेल, आकांक्षा पेवेकर व दिशा वडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अनिल वाणी यांनी केले.


Post a Comment