दारूच्या अतती सेवनाने म्हसळयात शिक्षकाचा मृत्यू : मरेपर्यंत  सतत पीत होता दारू


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा न्यू इंग्लीश स्कुल मधील दयानंद शिवानंद तेली वय ४७ मूळ रहाणार आण्णाभाऊ साठे स्मारका जवळ, वाटेगाव, ता. वाळवा , जि. सांगली या शिक्षकाचा अती मद्य सेवनाने म्हसळयात मृत्यू झाला. म्हसळा पोलीसानी अ. मृ. र.नं.१२/२०१८ C. R. P. C 174 प्रमाणे नोंद केली आहे. त्याचे  संपर्कात असणारे  व अन्य शेजाऱ्यानी त्याला दारूचे व्यसन होते , तो दारुचे आहारी जास्त गेला होता , त्याला जेवणा खाण्याची क्षुद्ध नसे असे सांगितले. मयत तेली हा ऑक्टो.२०१८ पासून श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कुल म्हसळा या हायस्कूल वर ९-१ ०वीच्या विद्यार्थाना हिंदी विषय शिकवीत असत. पत्नी प्रा शिक्षीका दोन  मुले अशा कुटुंबात कौटुंबिक स्वास्थ नसल्यामुळे तेली गेले काही वर्ष व्यसनाच्या आहारी गेला होता अशी चर्चा आहे?

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा