म्हसळ्यातील अतिक्रमण पुर्ववत ; दुकानदारांकडुन नगरपंचायतीच्या धाकाला केराची टोपली


म्हसळा : वार्ताहर
दुकान लहान आणि पसारा मोठा अशी अवस्था म्हसळा शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असताना ग्राहक आणि फेरीवाल्यांच्या अंतर्गत वादविवाद होत असल्याचे तक्रारी वरून म्हसळा नगर पंचायतीने बाजारपेठेतील केलेले अतिक्रमण एकदा नव्हे दोनदा तोडुन ठोस कारवाई केली . मात्र नगरपंचायतीच पाठ फिरताच हठविलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे करून जागा व्यापून टाकली जात आहे . मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांनी व्यापून टाकलेली जागा ही नगर पंचायतीच्या मालकीची असताना व्यवसाय करणारे दुकानदार नगर पंचायतीच्या धाकाला वेळ वेळी केराची टोपली दाखवीत आहेत . म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी ठोस कारवाई करून दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविले आहे . अतिक्रमण हटविण्याची ही तिसरी कारवाई ठरणार आहे म्हसळा नगर पंचायत कायद्याच्या चौकटीत राहुन शहरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत असताना दुकानदार पुन्हा पुन्हा कायदा हातात घेत असल्याने संबंधितांवर पोलीस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा