महादेव पाटील मित्र मंडळ उद्घाटनाचे कार्यक्रमात अॅड. राजीव साबळेंचा तटकरेंवर घणाघात.


तटकरेंचे साधे सूत्र विजयाचे वेळी तटकरे : पराभवाला अन्य.

राजू साबळे पासून टोकरें पर्यंत सर्वच नालायक कसे?साबळेंचा सवाल

संजय खांबेटे: म्हसळा


  महादेव पाटील मित्र मंडळ या संस्थेचे  उद्घाटन आज शनी. दि.२२ रोजी खारगांव ( खु ) येथे महादेव पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी उद्घाटक  महेंद्रशेठ दळवी, अॅड. राजीव साबळे ,शाम भोकरे , महादेव पाटील,सुनील उमरटकर, प्रविण करडे, अॅड. मुकेश पाटील,श्रीनिवास गाणेकर, रमेश घरत, संतोष जाधव, अनंत नाक्ती , नथुराम खोत, गणेश हेगीष्टे, सुधाकर जंगम, कृष्णा म्हात्रे, उदय कळस , महेश पाटील , गोपाळ खोत, अंकुश गाणेकर, हेमंत नाक्ती, अरुण जंगम, संदीप कांबळे, नितीन पेरवी, यशवंत गाणेकर, अलका कांबळे, अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, भालचंद्र नाक्ती, पांडुरंग भायदे, सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
     योग जरी महादेव पाटील मित्र मंडळ या संस्थेच्या  उद्घाटनाचा आसला तरी उद्घाटक व प्रमुख अतिथी असणारे  महेंद्रशेठ दळवी, अॅड. राजीव साबळे ,शाम भोकरे  व यजमानी महादेव पाटील ही सर्व मंडळी पूर्वाश्रमीची  राष्ट्रवादी कॉंग्रेसची व तटकरेंच्या राजकारणाने प्रंचड दुखावलली सहाजिकच आहे. शामरावांपासून सर्वानीच तटकरेंवर आगपाखड केली. शाम भोकरे यानी तटकरे ना.अनंत गिते याना काम दाखवा १ लाख रु बक्षीस द्या अशी उपरोधीक टीका करतात तटकरे आता पुरे झाले, गीते नी आपला निधी परीपूर्ण संपवल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.पक्षाचे विधान परीषद व राज्यसभेच्या प्रतिनिधींकडूनही भरघोस निधी आणला आहे  अतीशयोक्तीची टिका थांबवावी असे सांगितले. महेंद्रशेठ दळवी यानी मी आलिबागकर आसल्याने मी शेका पक्षाचे जयंत पाटील याना तर पूर्वी राष्ट्रवादीत असल्याने तटकरेना जवळून ओळखतो , दोन दुश्मन एकत्र आल्याने जिल्हयाचे नुकसान कसे झाले या विषयी इत्यंभूत माहिती मी स्वतंत्र व्यासपीठावर सांगीन , आम्ही मागील लोकसभा निवडणुकीत तटकरेना २१,५०० मते दिली होती, आता तीच मते गीतेंच्या पारडयात जाणार आहेत या वेळी विजय अनंत गीतेंचाच आहे. अॅड. राजीव साबळे यानी तटकरेंवर चांगलेच तोंडसुख घेत महेंद्रशेठ दळवी, शाम भोकरे  व यजमानी महादेव पाटील आम्ही सर्व मंडळी तटकरेंच्या शाळेत असताना कधीच वरच्या वर्गात गेलो नाही , कायम त्याच वर्गात, तटकरेंचे धोरण प्रचंड मतलबी होते. विजयाचे वेळी तटकरे  पराभवाला अन्य , कधीतरी संधी येईल असे सतत वाटत असे , शेवटी गुलामगिरी सहन करणारा अपराधी असतो याची जाणीव झाली व आम्ही एकेक करून तटकरेंची साथ सोडली .राजू साबळे तटकरेंना नालायक झाला आता साबळे पासून टोकरें पर्यंत सर्वच नालायक कसे? असा साबळेंनी सवाल केला. मला तटकरेनी २५ वर्षात दिले नाही ते शिवसेनेनी २ -३ वर्षात दिले सर्वसामान्याना संधी देणारी शिवसेना आहे.

आम्ही अनेक वर्षे  " आगरी भवन" साठी महादेवराव सतत निधी मागत असत, आज प्रचंड मोठी असणारी वास्तू बघून खरच आनंद व दुःख झाले.आनंद फार मोठी वास्तू होते त्याचा तर. दुःख ती  अद्यापही अर्धवट आहे त्याचे.ती नक्कीच पूर्ण होईल असे सर्व च मान्यवरानी सांगितले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा