म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत वेगवेगळ्या महसुली गावांमध्ये मालकी जमिनीत मोठ्या प्रमाणात जांभा दगड उत्खनन सुरू आहे. या उत्खनणामुळे आजूबाजूच्या परिसरात ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण असे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून या जांभा दगड उत्खनन करणाऱ्या खाण मालकांच्या मनमानी कारभाराकडे संबंधित ग्रामपंचायती व महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. जांभा दगड उत्खनन करण्यास महसूल विभाग व ग्रामपंचायत यांच्या परवानगीने दाखले जरी काही खाण मालकांनी घेतले असले तरी काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत आहे अशाच प्रकारे एका खाणीवर वीज चोरून घेतली असल्याची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी समोर आणली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील नेवरूळ ग्रामपंचायत हद्दीत एका शेतकऱ्याच्या मालकीच्या जागेत श्री.चव्हाण हे जांभा दगड उत्खनन करीत आहेत. याठिकाणी वीज वितरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता जांभा दगड उत्खनन करण्यासाठी चोरून विजेचा वापर करण्यात येत आहे अशी माहिती नेवरूळ येथील काही ग्रामस्थांनी दिली आहे. तसेेेच जांभा दगड उत्खनन करताना विजेचा वापर केल्यामुळे नेवरूळ गावासाठी असणाऱ्या वीज पुरवठा प्रवाहावर सुद्धा परिणाम होत आहे असेही माहिती समोर आली आहे.
या वीज चोरी प्रकरणासंदर्भात नेवरूळ ग्रामपंचायत सदस्यांना विचारले असता त्यांनी याबाबतीत ग्रामपंचायतला कोणतीच कल्पना नाही आम्ही फक्त जांभा दगड उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे असे ग्रा.पंचायत कडून सांगण्यात आले आहे तसेच वीज वितरण विभाग म्हसळा अधिकारी वर्गाला याबाबत माहिती विचारली असता त्यांचेकडूनही असे सांगण्यात आले आहे की आमच्या कार्यालयाकडून संबंधित जांभा दगड उत्खनन ठिकाणी किंवा संबंधित शेतकऱ्यांनी किंवा जांभा दगड उत्खनन करणाऱ्या मालकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही किंवा आम्हाला कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही त्यामुळे वीज वितरण विभागाला अंधारात ठेऊन त्या ठिकाणी वीज चोरीच्या मार्गाने घेऊन उत्खनन करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती आहे. तर महसूल विभागाच्या काही अधिकारी वर्गाला या जांभा दगड उत्खनन व त्या ठिकाणी घेतलेले विद्युत जोडणी किंवा वीज चोरी बाबत विचारले असता नेवरूळ गावात नक्की जांभा दगड उत्खनन कुठे सुरू आहे हेच माहीत नसल्याचे सांगण्यात आले आहे यावरून महसूल विभागाचे अधिकारी देखील किती जागृत आहेत हा देखील प्रश्न निर्माण होत आहे तर जर ही जांभा दगड उत्खनन खाण महसूल विभागाच्या रेकॉर्डवर नसेल तर शासनाचा महसूल बुडवला जातोय की काय हा देखील प्रश्न आहे.
संबंधित जांभा दगड उत्खनन ठिकाणी नेवरूळ रस्त्यावर असलेले मेन विद्युत वाहिणीचे खांबावरून तीन लाईन वरून तीन शेडे टाकून काळ्या कलरची जाड केबल वायर जोडून जिथे उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणापर्यंत विद्युत जोडणी करण्यात आलेली आहे. हा सर्व प्रकार चोरी छुपे होत असताना नेवरूळ ग्रामपंचायत, महसूल विभाग अधिकारी, वीज वितरण विभाग अधिकारी झोपेत होते की काय किंवा जाणीवपूर्वक या प्रकरणी कोणाला पाठीशी घालत आहेत की काय असा संतप्त सवाल या भागातील नागरिक करीत असून या वीज चोरी प्रकरणी संबंधित जांभा दगड उत्खनन करणारा मालक, ज्या वीज वितरण विभागाच्या अधिकारी वर्गाने मदत केली आहे त्यांच्यावर व या वीज चोरी प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
नेवरूळ येथील जांभा दगड उत्खनन ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांना जागेवरून जाऊन पाहणी करण्यासाठी सांगण्यात येईल तसेच ज्या खाण मालकाने वीज चोरी करून त्या ठिकाणी विजेचा वापर करून उत्खनन करीत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-श्री.रामदास झळकेत, हसीलदार म्हसळा
नेवरूळ येथे सुरू असलेल्या जांभा दगड उत्खनन करण्यासाठी आमच्या वीज वितरण विभागाला कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही किंवा आमच्या कार्यालयाकडून कोणतीही परवानगी दिलेली नाही जर त्याठिकाणी चोरून वीज घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या खाण मालकावर वीज चोरी प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच ज्या वायरमन ने यासाठी मदत केली असेल त्या वायरमन वर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-श्री.यादव इंगळेउ, पअभियंता वीज वितरण विभाग म्हसळा
नेवरूळ ग्रामपंचायत कडून संबंधित खाण मालक श्री.चव्हाण यांना फक्त जांभा दगड उत्खनन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वीज वापर करण्यास परवानगी दिलेली नाही त्यामुळे संबंधित प्रकाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल व उत्खनन करण्याचा परवाना रद्द करण्यात येईल.
- श्री.नामदेव महाडिकउ, पसरपंच नेवरूळ ग्रामपंचायत
संबंधित जांभा दगड उत्खनन ठिकाणी वीज चोरून घेतल्यामुळे आमच्या गावात लाईटची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी वीज घेण्याची परवानगी कोणी दिली व कशी दिली या बाबत सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
-श्री.तुकाराम दिवेकर, माजी सरपंच नेवरूळ ग्रामपंचायत

Post a Comment