प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
2018 च्या सरत्या वर्षाला निरोप देण्या करिता रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्या अनुशंगाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.जिल्हयांतीत सर्व बीच, अन्य पर्यटन स्थळे मार्केट परिसर तसेच अन्य महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
आज पासूनच बंदोबस्त सुरू असून बंदोबस्त करिता मा. अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 60 सह. पोलिस निरीक्षक /पोलिस उपनिरीक्षक, 394 पुरूष कर्मचारी, 94 महिला कर्मचारी व 106 वाहतूक तसेच RCP कर्मचारी व पोलिस अधीक्षक कार्यातील राखीव बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Post a Comment