नागोठणे येथे " सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल " व्हावे अशी आमदार सुनील प्रभू यांची मागणी.


संजय खांबेटे : म्हसळा 
     संपूर्ण कोकणात वाढते उद्योग धंदे, पर्यटन या अनुषंगाने रायगड -रत्नागीरी जिल्ह्याना मध्यवर्ती असणाऱ्या  नागोठणे येथे " सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल " व्हावे अशी आभ्यासू मागणी शिवसेनेचे दिंडोशी येथील आमदार सुनील प्रभू यानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या आरोग्य व महसूल विभागाने नागोठणे येथे संभावीत  जागेची पहाणी करून नागोठणे शहराजवळ ९ एकर जागेत  सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचा प्रस्ताव सादर केला आहे.
     प्रभू यानी मागणी केलेले  सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल हे 
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे या मध्यवर्ती ठीकाणी असणार आहे.२०० खाटांचे हॉस्पीटल शासन विशेष बाब म्हणून करणार आहे.या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ला रोहा, पेण व माणगाव तालुक्यांतील संदर्भीत सेवा मिळू शकणार आहे.रुग्णालयाकरीता तज्ञ डॉक्टर , अधिकारी कर्मचारी असे ३८० कर्मचारी लागणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा