जखमी चार शिंगाच्या हरिणाला म्हसळा पोलिसांनी दिले जिवनदान : भटक्या कुत्र्यांपासून सुटका करून वन विभागाकडे केली सुपुर्द.



म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा शहरातील पोलिस चेकपोस्ट जवळ भटक्या कुत्र्यांपासून आपले जीव वाचवत जखमी अवस्थेत आलेल्या चार शिंगी हरिणला (भेकर) म्हसळा पोलिसांनी जिवनदान दिले आहे. या हरिणचे तब्बल चार ते पाच भटक्या कुत्र्यांपासून सुटका करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि. २० डिसेंबर रोजी म्हसळा शहरालगतील जंगलामधून चार पाच कुत्रे मागे लागल्याने एक हरिण धावत स्त्याच्या दिशेने आल आणि म्हसळा चेकपोस्ट जवळ येऊन एका खडयात पडल. चेकपोस्ट मध्ये कार्यरत असणारे पोलिस शिपाई देवा जाधव व पो.ना. वैभव पाटील यांच्या एक हरिण जखमी अवस्थेत पडले असून, कुत्रे त्याच्या मागे आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यानी तेथे असणारे राजेश कुडेकर, अजय भगत, निलेश ढवळे यांच्या सहाय्याने त्या हरणाला बाहेर काढले व वन विभागाच्या ताब्यात दिले. म्हसळा वनक्षेत्रपाल एन.डी. पाटील यांनी त्वरीत प्राण्यांचे डॉक्टर खरात यांच्या सोबत संपर्क करून या हरणाचा इलाज केला. देखरेख खाली ठेवल्यानंतर वनक्षेत्रपाल एनडी पाटील, वनपाल म्हसळा एस.पी थळे, वनपाल देहेन आर.एस.थळकर, वनरक्षक बनसोडे, आमरे, वाघे वनमजुर कसबळे, निलेश ढवळे, पंच अक्षय गोलांबरे, जितेश दिवाळे यांच्या समक्ष शुक्रवार दि.२१ डिसें. रोजी जंगलात सोडून देण्यात आले. एका हरणाला वाचवण्यासाठी म्हसळा पोलिस व वन विभागाने केलेल्या प्रयत्ना मुळे त्यांचे तालुक्यातून कौतूक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा