श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजाई माता रथो उत्सव भाविकांची दर्शनासाठी गर्दी ; मंदिर परिसर रोषणाई व फुलांनी सजला



श्रीवर्धन : संतोष सापते
      
सोमजाई माता श्रीवर्धन गावाची ग्रामदेवता आहे .नवरात्र उत्सव व रथो उत्सव प्रसंगी श्रीवर्धन तालुक्यातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात .सोमजाई जागृत देवस्थान आहे .रथोत्सवात मार्गशीर्ष कृष्णपक्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष दशमी या कालावधीत संपन्न होतो .मार्गशीर्ष नवमी ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले .सदर प्रसंगी श्रीवर्धन तालुक्यातील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
   महाराष्ट्रातील नावाजलेले तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून श्रीवर्धन शहर प्रसिद्ध आहे.पुराण व उपनिषदात श्रीवर्धन चा उल्लेख आढळतो .अगस्ती ऋषींच्या पदपावन स्पर्शाने श्रीवर्धन ची भूमी पवित्र झाली आहे असा इतिहास आहे.दक्षिण काशी हरिहरेश्वर श्रीवर्धन तालुक्यात वसलेले आहे.श्रीवर्धन ची ग्रामदेवता माता सोमजाई आहे .
श्री सोमजाई देवस्थानाची स्थापना श्री अगस्ती महामुनीने केली असून देवस्थानाच्या चतु :सीमेस चार शिवशक्ती आहेत .त्यांची नावे कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी, चामुंडायनी अशी असून मुख्य देवता मंदिरात श्री सोमजाई या नावाने प्रसिद्ध आहे .श्री सोमजाई शाळीग्राम रुपात असून शिव , भवानी,नंदी व वासुकी या चार शक्ती एकत्र आहेत .  सोमजाई मंदिर चा परिसर जवळ पास 38 गुंठे आहे .मंदिराची रचना व स्थापत्य कला पांडवकालीन असल्याचे निदर्शनास येते .साधारणतः 35ते 40 फुट उंचीवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर चे मुख्य छत कौलारू आहे .मंदिर बांधणीत  जुन्या काळातील सागवान लाकडाचा वापर सर्वत्र करण्यात आल्याचे दिसून येते आहे .सोमजाई मातेच्या समोरच श्रीराम भक्त मारुती ची मूर्ती  स्थानापन्न केली आहे .तसेच मंदिराच्या प्रांगणात साईबाबाची मुर्ती ,तुळशीवृंदावन व श्री गणेश यांची स्थापना केली आहे .वर्ष भर येणाऱ्या भाविक व देणगी दार दात्यांच्या दानांतून मंदिर जीर्णोद्धाराचे काम यशस्वी झाले आहे. रथोउत्सवाची अनेक वर्षाची परंपरा सोमजाई मंदिरात जोपासली जात आहे. तालुक्यातील असंख्य भाविक सोमजाई चरणी मनोभावे नतमस्तक होतात .  भाविकांच्या अनंत इच्छा पुर्ण करणारी देवी म्हणून सोमजाई ओळखली जाते. 
श्रीवर्धन शहरात पुर्वी प्लेगची साथ प्रतिवर्षी येत असे तेव्हा कसबा मजकूर गावसयने श्री सोमजाई  ला मनोभावे प्रार्थना करून शालिवाहन शके 1799 मध्ये सप्ताह उत्सवाला सुरुवात करून रथ उत्सवाला प्रारंभ करण्यात आला  आहे .सोमजाई श्रीवर्धन ची ग्रामदेवता असल्यामुळे श्रीवर्धन मधील सर्व समाज बांधव हिरीरीने सोमजाई उत्सवात सहभाग घेतात . 
श्री सोमजाई चे नंदादीप चालविणारे चार खुम कसबा भंडारी समाज, नवीपेठभंडारी समाज, वाणी समाज, सोनार समाज असे आहेत . महाप्रसाद वाटप प्रसंगी र ना राऊत विद्यलयाच्या विद्यर्थ्याने   महत्वाची भूमिका बजावली आहे रथोउत्सवाची सांगता मार्गशीर्ष दशमीला होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा