देवघरकोंड गावाचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांजवळ जुळलेली नाळ आजन्मापर्यंत राहणार - सुनील तटकरे



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आम्ही विकास करताना केवळ मतांसाठी राजकारण करत नाही तर सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असलेला विकास सातत्यपूर्ण करीत आहोत. देवघर कोंड येथील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी माझ्याकडे जोडलेले नाते केवळ राजकारणा पुरते मर्यादित राहील असे नाही तर आता गावाच्या विकासासाठी जोडलेले ऋणानुबंद माझ्याकडुन आजन्म जोपासले जातील असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी गावाच्या हनुमान मंदिर सामाजिक सभामंडप बांधकामाचे उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले . सन २०१७ मध्ये आमदार असताना सुनील तटकरे यांचे विकास निधींतून देवघर कोंड येथील हनुमान मंदिराचे सभामंडप कामासाठी १५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्या कामाचे उदघाटन तटकरे यांचे शुभ हस्ते करण्यात आले . संपन्न कार्यक्रमाला सुनिल तटकरे यांचे समावेत मुंबई प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भास्करराव दाजी विचारे प्रदेश चिटणीस अलि कौचाली , जिल्हा संघटक बाळ शेट करडे , तालुका अध्यक्ष समीर बनकर , सभापती छाया म्हात्रे , जिल्हा परिषद सदस्य बबनराव मनवे , जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील , उप सभापती संदिप चाचले , माजी उप सभापती मधुकर गायकर , माजी पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका शिंदे , सरपंच सविता हिलम , महिला अध्यक्षा रेश्मा काणसे , युवक अध्यक्ष संतोष पाखड , गण अध्यक्ष अनिल बसवत , गण अध्यक्ष सतिश शिगवण , पक्ष संघटक श्रीपत मनवे , संघटक मुरलीधर महामुणकर , सदस्य गजानन गिजे , गजानन पाखड गीजे बुवा , युवक सघटक सुरज महामुणकर महा , ग्राम पंचायत सदस्य उदय महामुणकर , सुभाष कदम , अंकुश म्हात्रे आदि मान्यवर बहुसंख्य ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते. तटकरे यांनी पुढे बोलताना विरोधी पक्षाच्या लोकांनी गेली २५ वर्षे धर्माचा आणि जातीपातीचे राजकारण करत ग्रामीण भागातील जनतेजवळ फक्त मतांसाठी राजकीय व्यापार केला आम्ही विकास करण्यासाठी दिलेली वचन पालतो, नुसते भूमिपूजन नाही तर मंजुर कामांची उदघाटन करतो . डोळ्यावर पट्टी बांधली तरी श्रीवर्धन मतदारसंघातील गावागावात पोहचून त्या गावाचे ठिकाण आणि नाव सांगु शकतो असे ठासून सांगत आम्ही विकास काम करतो म्हणूनच जनता आम्हाला अधिक काम करण्यासाठी मागणी करित असते . जे विकास करीत नाहीत ते आयत्या वेळी येतात आणि खोटनाट सांगुन मत मात्र मिळवितात अशी खत व्यक्त करताना चालत असलेल्यालाच काठ मारली जाते ती आमच्यासाठी असते असे उपहासात्मक टोळा मारला . यावेळी मतांची पेटी आमच्या पारड्यात टाका असे सुचित करताना या पुढेही तटकरे यांनी देवघर कोंड आणि परिसरातील गावांचा अधिकतम विकास करण्यात येईल असे आश्वासन दिले . देवघर कोंड हनुमान मंदिर सभामंडपाचे विकास कामाला भास्कर दाजी विचारे यांनी व्ययक्तिक एक लक्ष रुपयांची देणगी दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा