मेंदडी प्रतिनिधी
तटकरेंचे संस्थान खालसा करणारे अजून जन्माला यायचे आहेत . कोण कोणाचे संस्थान खालसा करतो ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना कळेल . तुमच्या अस्तित्वाची काळजी करा , माझी काळजी करायला माझे कार्यकर्ते सक्षम आहेत , असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ना . अनंत गीते यांना दिले . मेंदडी कोळीवाडा येथील सभामंडपाचे उद्घाटन श्री . तटकरे यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी सभापती छाया म्हात्रे , अलिशेठ कौचाली , तालुकाध्यक्ष समीर बनकर उपसभापती संदीप चाचले, उज्ज्वला सावंत , मधुकर गायकर , जि . प . सदस्य बबन मनवे परशुराम मांदाडकर, तुकाराम मांदाडकर लहूशेठ म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी वारळ येथील दत्त मंदिराला श्री . तटकरे यांनी भेट दिली .
या उत्सवाचे निमित्त साधून सुनील तटकरे यांनी मेंदडी कोंड, मेंदडी कोळीवाडा, खारसई आदि गावांना भेटी देऊन विकास कामांचे उद्घाटन केले . यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी गेल्या साडेचार वर्षात केंद्रीय मंत्री या भागात फिरकले नाहीत , आता निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना लोकांची आठवण येऊ लागली आहे . निवडणुका जवळ आल्या की जनतेची आठवण येण्याऱ्या केंद्रीय मंत्र्यांना या वेळी धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही , असा विश्वास व्यक्त केला .


Post a Comment