म्हसळाः प्रतिनिधी
राजस्थान छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धवक्का दिला . म्हसळा काँग्रेसच्या कार्यकर्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाईवाटप करून आनंद व्यक्त केला . जसजसा निकाल जाहीर होत होता , तसा कार्यकत्यमध्ये उत्साह वाढताना दिसत होता . म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ . मुईज शेख आणि कार्यकर्ते यांनी शहरात फटाके फोडून , पेढे वाटून सोनिया गांधी , राहुल गांधी यांचा जयघोष केला . या प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष महादेव पाटील , शहराध्यक्ष रफिक घरटकर , उपशहरप्रमुख अजित कळस , अकमल कादिरी , इब्राहिम कासार मुजीब सुभेदार , नजिर साने अस्लम चिलमाई , घरटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते . पक्षकार्यालयासमोर कार्यकर्यांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष डॉ . मुईज शेख यांनी सांगितले , भाजपाला जनतेनेच धडा शिकवला असून त्यांची जागा त्यांना वेळीच दाखवली . निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा भाजपाला विसर पडल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचे डॉ . शेख यांनी आवर्जुन सांगितले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रायगड लोकसभा व विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल , असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले .
Post a Comment