गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात 3 लाख 52 हजार बालकांना लसीकरण ; तालुक्यात ७८ .६७ % काम , 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील ९३२२ बालकांना केले लसीकरण






संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
 भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवार (दि.27 नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.11 डिसेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार 688 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
      म्हसळा तालुक्यात आजपर्यंत म्हसळा , मेंदडी व खामगाव प्रा.आ. केंद्राचे माध्यमातून  आज बुधवार दि१२  पर्यत ४८२८ मुले व  ४४९४ मुली असे एकूण ९३२२ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी सूरज तडवी यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले.तालुक्यातील ग्रामिण रुग्णालयाचे माध्यमातून या कार्यक्रमा साठी विशेष उपक्रम राबविले जात नसल्याचे समजले.
    तालुक्यातील खरसई  प्रा.शाळेत आज गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम राबविला गेला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री वाय.एम्.प्रभे साहेब ,परकाळे साहेब, माजी सरपंच निलेश मांदाडकर, भालचंद्र म्हसकर ,गणेश मांदाडकर, प्रा.आ. केंद्र. मेंदडीचे अरुण कोल्हे, मुख्याध्यपिका बीर्जे मँडम, सानप सर .गाडेकर सर, एस. एम. सी. चे बहुतांश सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते.


फोटो : भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान खरसई शाळेत राबविण्यात येत आसतानाचे छायाचित्र.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा