प्रतिनिधी म्हसळा
रविवार, दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 4 वाजता ग्रामविकास मंडळ तोराडी - मुंबई ( रजि ) च्या वतीने श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दारारासाठी तोराडी दिनदर्शिका - 2019 चा प्रकाशन सोहळा डहाणूकर हाॅल, डहाणूकर बिल्डींग, ताकवाडी समोर आयोजित करण्यात आला. दिनदर्शिकेचे प्रकाशन मंडळामधील वरिष्ठ सभासद श्री. पांडुरंग मुंडे, श्री. अनंत म. नलावडे ( मा. अध्यक्ष ) व श्री. रविंद्र खेरटकर ( मा. सचिव ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यकमाला मुंबई कमिटीचे श्री. विजय डोंगरे ( अध्यक्ष ), श्री. संतोष कुळे ( उपाध्यक्ष ), श्री. संतोष खेरटकर ( सचिव ), श्री. कल्पेश खेरटकर ( उप सचिव ), श्री. अजय मुंडे, श्री. अनिष नलावडे, श्री. विशाल डोंगरे, श्री. अनंत म. नलावडे, श्री. योगेश कुळे, श्री. संदेश दुर्गवळे, श्री. प्रसाद विचारे, श्री. मनोज नलावडे, श्री. विकास कुळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छापण्यात आलेल्या १००० दिनदर्शिकेच्या प्रती आजूबाजूच्या गावांत विनामूल्य वाटणार आहोत अशी माहिती मंडळाच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमाच्या वेळी दिली.
Post a Comment