सिध्दगिरी हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांच्यामार्फत मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन !




"सिध्दगिरी हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांच्यामार्फत मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन ! "

देशातील नामवंत कॅन्सर तज्ञ करणार शस्त्रक्रिया !!! कोल्हापूर / कणेरी है “ रुग्णसेवा हीच ईशसेवा’ व ‘निराधारांना आधार" या बीदानुसार संचलित "सिध्दगिरी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, कणेरी" तर्फ अहमदाबाद,बंगळूर,हैद्राबाद,मुंबई,पुणे येथील राष्ट्रीय स्तरावरील कॅन्सर तज्ञांच्या मार्फत दि. १४ ते १६ डिसेंबर २०१८ पर्यंत "मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया
शिबीराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या कॅन्सर शिबीरात डॉ.जे.डी.पटेल (अहमदाबाद), डॉ.चैतन्य श्रॉफ (अहमदाबाद)
डॉ.आदित्य पुणामिया (मुंबई), डॉ.सत्यजित दंडगी, डॉ.रमेश (बंगळूरू), डॉ.प्रविणकुमार (हद्राबाद)डॉ.अनुप ताम्हणकर (पुणे)यांच्यासह सिध्दगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ.प्रशांत लाड, डॉ.रश्मी गुडूर, डॉ.आनंद गुडूर, तपासणी तसेच डॉ. अभिजीत पोवार आणि डॉ.सौरभ भिरूड हे पुर्व रूण आणि शस्त्रक्रिया करणार आहेत. आज आरोग्याच्या दृष्टीने कर्करोग ही जागतिक समस्या बनली असून प्रामुख्याने तंबाखू  सेवनमद्य,  अतिमेद, मसालेदार पदार्थांचे सेवन,तंतुमय पदार्थाचा आहारामध्ये अभाव, निरनिराळी औद्योगिक रसायने व उत्पादने, विषारी आहार व बदलती आहारशैली इ.मुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांमध्ये तंबाखू, धुम्रपान सेवन व पान यामुळे तोंडाचा, श्वासनलिकेचा,
घशाचा व फुफ्फुसाचा तर स्त्रियांमध्ये स्तन व गर्भाशय यांचा प्रामुख्याने कर्करोग होतो. अत्यंत माफक दरात उत्कृष्ट व अत्याधुनिक सेवा देणा-या "सिध्दगिरी हॉस्पिटलने" गेली
अनेक वर्ष बांधिलकीची पंरपरा जपत समाजातील दुर्बल घटकांच्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत व या आरोग्यसेवेचा हजारो रूग्णांनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्र शासन व कर्नाटक शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ ही येथील रूग्णांना मिळत असून त्यामुळे अल्पावधितच
सिध्दगिरी हॉस्पिटलला ‘गरीबांचे हॉस्पिटल" असा लोकिक प्राप्त झाला आहे
येथील कॅन्सर विभागामार्फत पाचशेहून अधिक अनेक गुंतागुंतीच्या मोठ्या कॅन्सर सर्जरी आज अखेर मोफत करण्यात आल्या आहेत .थोरॅसिक न्युमोनेक्टॉमी , पोटाच्या कॅन्सरसाठी लॅपरोस्कोपीक ऍडीकल डी २ डिसेक्शन, हेड अॅन्ड नेक पॅरॉटीड आणि थायरॉईड सर्जरी विथ नर्व मॉनेटरींग वगैरे शत्रक्रिया कोल्हापूरात प्रथमच या रूग्णालयात झाल्या आहेत याशिवाय अत्याधुनिक अशा किडनी कॅन्सर करीता लॅपरोस्कोपीक रॅडीकल नेफोरेक्टॉमी, तोंडाच्या कॅन्सर करीता मायनोव्हेस्कूलर फ्लॅप ऑपरेशन, बीजाशयाच्या कॅन्सर करीता सायटोरिडक्शन ऑपरेशन अशा अनेक शस्त्रक्रिया या
रूग्णालयात यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेल्या आहेत. या बरेबरच सुसज्ज केमोथेरपी विभागामार्फत अनेक रूग्णांना जिवनदान दिलेले आहे. आधुनिक पध्दतीने निदान व रोगाच्या प्राथमिक अवस्थेतील उपचार यामुळे कर्करोग पुर्ण बरा
होऊ शकतो व आपण मृत्यू टाळू शकतो .सिध्दगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर" तर्फ दि. १४ ते १६ डिसेंबर २०१८ पर्यंत "मोफत कर्करोग निदान व शत्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबीरात निदान करण्यासाठी गरजू रूग्णांनी दि.१0 डिसेंबर पर्यंत प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी
करावी .
 नोंदणी व अधिक माहितीसाठी 
फोन 0२३१ २६७१७७५,२६८७५० तसेच 
डॉ . रेशम राजपूत ९४२११२७९१७ व 
डॉ.प्रमोद घाटगे ९९२२११५७८२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजक सिध्दगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रवीण नाईक यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा