● १८ मंजूर पदा पैकी ११ पदे रिक्त
● रिक्त पदांमुळे अतिरिक्त कामाचा बोजा वाढला
संजय खांबेटे, म्हसळा
म्हसळा तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यलयातील 18 पदे मंजूर असताना त्यापैकी चक्क 11 पदे रिक्त असल्याचे आज स्पष्ट झाले .शासनाच्या निष्कर्षानुसार कार्यलयाला 18 पदे मंजूर करत जनतेची असणारी जमिनी विषयक विविध कामे करण्यास हे कार्यालय आजही तत्पर आहे.परंतु 11 पदे रिक्त असल्या कारणाने त्याचा अधिकभार 7 कर्मचारी अधिकारी त्यांना करावा लागत आहे.7 अधिकारी कर्मचारी असताना देखील तालुक्यात दिली जाणारी सेवा ही समाधन कारक असली तरी रिक्त कर्मचाऱ्यांची गरज आजही भासत आहे.कारण नियमित दरोजची कामे हद्द कायम बिनशेती व पोटहिस्स मोजणी,रस्ताची भूसंपादन त्या सत्र्व प्रकारची मोजणी कोर्ट कमिशनर व कोर्ट वाटपाच्या मोजणीची कामे अभिलेख दुरुस्ती व इतर नक्कल नकाशे पुरवणे,अशा प्रकारचे विविध कामे करण्यासाठी आजही कर्मचारी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयामध्ये रिक्त पदे भरली गेली.तर आजपेक्षा कामाची व्याप्ती निश्चित वाढेल.रिक्त पदांच्या अभिलेखाची माहिती उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय म्हसळा यांनी जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय अलिबाग यांच्याकडे माहिती सादर केली आहे.
ही आहेत रिक्त पदे
1 ) निमदातर -क्रमांक 1, क्रमांक 2
2 )दुरुस्ती लीफिक -1
3 )भूमापक -1
4 )छाननी लीपिक 1
5 )प्रतीलिपि लिपिक-1
6 )नगर भूमापक लिपिक 1
7 )दप्तर बंद -1
8 )शिपाई 3
अशी आहेत नियमित कामे
हद्द कायम, बिनशेती व पोटहिस्स मोजणी,रस्ताची भूसंपादन त्या सर्व प्रकारची मोजणी, कोर्ट कमिशनर व कोर्ट वाटपाच्या मोजणीची कामे ,अभिलेख दुरुस्ती , इतर नक्कल, नकाशे पुरवणे
इमारतीची नासधुस
एक वर्षात नविन इमारतीचे नासधूस भूमिअभिलेख कार्यलय म्हसळा यांची इमारत ताब्यात घेऊन एक वर्ष पूर्ण न होतास इमारतीची परिस्थिती बिकट झाली आहे.दरवाज्याच्या कड्या तुटल्या,कोटा लादी आजही ओबडधोबड आहेत.खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत,अशा एक नव्हे,अनेक समस्या इमारतीत उद्भभवत आहे.त्यामुळे नव्याने बांधलेली इमारत किती दिवस टीकणार हे न बोललेले बरे.

Post a Comment