कासारकोंड शाळा झाली डिजीटल


श्रीवर्धन : प्रतिनिधी
कासारकोंड गावातील जिल्हा परिषदेची शाळा ग्रामस्थ मंडळ , कासारकोंड यांच्या सहकार्याने डिजीटल झाली . ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती , क्रिकेट संघ , माजी विद्यार्थी संघ यांनी स्वखर्चाने जिल्हा परिषदेची शाळा डिजीटल केली . डिजीटल शाळेचे उद्घाटन सहादेव मालू डाऊल यांच्या हस्ते करण्यात आले . शाळेचे मुख्याध्यापक मनोज माळवदे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सादर करून डिजीटल शाळा संकल्पना व त्याची गरज विषद केली . भिकू पांगारकर केंद्र प्रमुख दांडगूरी यांनी ' प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ' दांडगुरी केंद्र हे प्रगत केंद्र असल्याचे मनोगतात सांगितले . गटशिक्षण अधिकारी नूर मोहम्मद राऊत यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषदेच्य शाळा खाजगी शाळांपेक्षा शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असून मुलांनी आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतले पाहिजे , तसेच पालकांनी आपल्या मुलाना शासनाच्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले . यावेळी दांडगुरी केंद्रातील मुख्याध्यापक सुधिर घडसे , क्रांती भोसले , माजी मुख्याध्यापक प्रकाश पडवळ , अजित भंडारी , ग्रामस्थ उपस्थित होते . सूत्रसंचालन संदिप भायदे व प्रभाकर वाघे यांनी केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा