माणगाव -दिघी राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांसाठी आगरी समाज नेतृत्व करणार

फोटो. प्रांत अधीकारी प्रविण पवार यांना निवेदन देताना समाजाचे अध्यक्ष श्री महादेव पाटील,सल्लागार श्री परशुराम मांदाडकर व अन्य शेतकरी

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
 दिघी माणगाव पुणे या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे माणगाव - म्हसळा- दिघी  या मुख्य टप्प्यांत  महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची  फसवणुक  करीत आहे, जमीनींचे अधिग्रहण जुने झाले आसल्याचे पुढे करीत शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत, शेतकऱ्याना योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे कामकाज करू नये याबाबत आगरी समाज संघटनेच्या वतीने मा. प्रांत अधीकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री महादेव पाटील,सल्लागार श्री परशुराम मांदा डकर,  आणि समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव आणि बहुसंखेने शेतकरी  उपस्थित होते.

राज्य शासन , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) ह्यांच्या चुकीच्या धोरणाने रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे . कोणत्याही जाती -धर्माचा शेतकरी त्याचा खरा धर्म राष्ट्रासाठी कष्टकरी असा असल्याने आवश्यकता वाटल्यास आंदोलनाची व्यापकता व तीव्रता वाढवीणार आहोत.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा