संजय खांबेटे : म्हसळा
राज्यांत नागरिकाना शासनाच्या सेवा गतीमान व योग्य मुदतीत मिळाव्या यासाठी राज्य शासनाने प्रथम सेतू, महा ई सेवा केंद्र व आता आपले सरकार सेवा केंद्र उघडून ऑन लाईन गतीमान व ठराविक मुदतीत सेवा देण्याचे असुनही म्हसळा तालुक्यातील महसुली विभागात आज मितीस तब्बल ३५० अर्ज पडून आसल्याचे समजते.
तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रात वय राष्ट्रीयत्व आणि आधिवास प्रमाणपत्र , तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाण पत्र, जेष्ठ नागरिक प्रमाण पत्र, पत दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, प्रतिज्ञा पत्र, वंशावळीचे प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी आसल्याचे प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला,भूमीहीन प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र,जातीचा दाखला , स्टोन क्रशर, दगड खाणपट्टा . गौण खनीज परवाना,असे नागरीकाना नोकरी, विविध कर्ज , निवडणूक,शिक्षण यासाठी सातत्याने लागणारे दाखले गतीमान व योग्य शुल्क भरून मिळावे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
काही दाखल्यांचा प्रवास केंद्र-R.N.T. -तहसीलदार- प्रांत असा असतो. तर काही दाखले -अव्वल कारकून-R.N. T .- तहसीलदार असा असतो . प्रांत अॉफीस मधून येणारे दाखले तात्काळ मिळतात .स्थानिक दाखल्याना मात्र उशीर होतो. आशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
नवीन निकषानुसार शंभर रूपयाच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही साध्या कागदा वरील प्रतिज्ञापत्र केंद्रावर स्विकारले जाणार आहे. लाभार्थाने कोणत्याही अर्जावर रु १० चा स्वतंत्र कोर्ट फी स्टँप लावून देऊ नये. सेवा केंद्रात घेण्यात येणारे शुल्क हे कोर्ट फी स्टँप चे किमतीसह असते असे महसुल व आय.टी. डीपार्टमेंटनी संयुक्त परिपत्रक काढूनही तहसील कार्यालयांत फार मोठया प्रमाणात स्टँप लावण्यासाठी नागरीकांची कामे अडविली जातात.
दाखले पडताळणी करण्याचे काम तालुक्यात वाढीव होत आसल्यास किंवा शैक्षणिक वर्षाचे सुरवातीला दाखले वाढल्यास अतीरीक्त आधिकारी नेमण्याची तरतूद मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. स्थानिक प्रशासनाने तशी मागणी केल्यास आम्ही पाठपुरावा करू.
-महादेव पाटील, माजी सभापती.

Post a Comment