(संजय खांबेटे प्रतिनिधी म्हसळा )
तालुक्यात सॅम- मॅमच्या बालकांची संख्या वाढत असल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांचे संयुक्त विद्यमाने म्हसळा येथील ग्रामिण रुग्णालयांत कँप घेऊन ६ SAM ( तीव्र कुपोषीत ) व ६०
MAM ( कुपोषीत ) बालकांची तपासणी , उपचार व पालकाना समुपदेशन करण्यात आले. यावेळी बालरोग तज्ञ डॉ. महेंद्र भरणे, आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ .स्मिता पाटील-ढवळे, ए.एन.एम्.समीक्षा मांजरेकर, फॉर्मासीस्ट वैशाली पाटील यानी पायावरील सूज, दंड घेर, वजन, उंची या बाबत तपासण्या केल्या. या वेळी आयोजित कार्यक्रमाला सभापती छाया म्हात्रे,माजी उप सभापती मधुकर गायकर, गटविकास अधिकारी श्री प्रभे,बालविकास प्रकल्प अधिकारी श्री व्ही.बी.तरवडे, शिक्षण अधिकारी संतोष शेडगे , पर्यवेक्षिका रेणुका पाटील,श्रीमती पालवे,प्राथमिक आरोग्य केंद्र परिचारिका,अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मातापालक मोठया संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील तीव्र कुपोषित 6 ( सॅम)बालक पंचायत समितीचे सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,माजी उपसभापती मधुकर गायकर,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,बालविकास प्रकल्प अधिकारी श्री तरवडे आणि शिक्षण अधिकारी संतोष शेडगे हे प्रत्येकी एक बालक दत्तक घेऊन या बालकांचे आरोग्य सर्वसामान्य बालकांप्रमाणे करण्यासाठी आवश्यक ते खाद्यपदार्थ,औषधे आणि इतर सुविधा स्वखर्चाने करणार आहेत.
म्हसळा तालुक्याची भौगोलिक रचना, अतीशय उत्कृष्ट व पोषक हवामान असताना तालुक्यात सॅम ६ व मॅम ६० बालक असणे हा विषय गंभीर आहे , दुर्लक्षीत करुन चालणार नाही. तालुक्याचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयांत तांत्रिक दृष्टया आवश्यक असणारी सर्व पदे कार्यरत असताना बालकाचे पालक,अंगणवाडी सेवीका, पर्यवेक्षिका यानी आहार, आरोग्य , संनियंत्रण संहीतेचे पुरेपुर पालन केल्यास सॅम- मॅम ची संख्या कमी होईल.
सेवानिवृत वैद्यकिय अधिकारी.

Post a Comment