संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथील चंद्रकांत धुमाळ या शेतकऱ्याने चरायला सोडलेल्या दुभत्यागाई परत आल्याच नाही म्हणून माहीती घेतली असता त्या चारही गाई गावा शेजारी असलेल्या खानलोशी येथील एका compound मध्ये मृतावस्थेत आढळल्या १४ ता. पासून चराला सोडलेल्या दुभत्या गाई आल्या नाही म्हणून वासरे हंबरडा फोडत होती तर मालक वण-वण जंगल, धरण परीसरांत फीरत गाईचा शोध घेत असताना दोन दिवसा पूर्वी गुरांचे मालकाला आपल्या गाई संबधीत compound मध्ये मृत आसल्याच्या आढळल्या. मृत गाईंचे सडलेल्या स्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी श्रीवर्धन यांनी P. M.केल्याचे ग्रामस्थानी सांगितले .
मेंदडी कोंड वरील ४ गाईंचा विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झाला असे वृत्त कळताच १८ गाव आगरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. महादेव पाटील, संबंधित शेतकरी चंद्रकांत धुमाळ , श्री. रत्नाकर पाटील (कापोली), दिलीप नाक्ती (वडवली), महेश धर्मा पाटील (मेंदडी), यानी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पोलीस अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली.
रात्री दिघी सागरी पो. स्टेशन मध्ये परीसरांतील हींदू- मुस्लीम कार्यकर्त्याची सभI होऊन त्यात झालेल्या निर्णया नुसार पोलीसानी गु.र.नं. ३५ / २०१८ भादवी ४२९ प्रमाणे गुन्हा नोंदवील्याचे पोलीस सूत्रानी सांगितले. यावेळी रमेश कांबळे अध्यक्ष बोर्ली, असीफ भाई, शंकर गाणेकर , रमेश म्हसकर, कुणाल पेडणेकर, शब्बीर उडरे, अनंत मयेकर, मंदार तोडणकर, स्वप्नील बीराडी, अक्रम साटवीलकर .शाम कांबळे, गोवींद कांबळे, जगदीश धुमाळ वगैरे पदाधिकारी होते.
" म्हसळा तालुक्यांतील गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या गाईचा दुर्देवी मृत्यू बाबत कसून चौकशी होणे आवश्यक आहे." फेन्सींग असलेल्या अगर उघडया जागेत आलेल्या मुक्या प्राण्याना मारणे हा फार मोठा गुन्हा आहे.पोलीसानी कोणालाही पाठीशी घालू नये.
महादेव पाटील, अध्यक्ष म्हसळा तालुका हिंदू संघटना

Post a Comment