संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळे तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागातील महत्त्वाची पदे रिक्त आसल्यानी शिक्षण क्षेत्रांत अंदाधुंद कारभार आसल्याचे तक्रारींत दिवसें दिवस वाढ होत असताना माजी सभापती महादेव पाटील यानी अशाच पद्धतीची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांचे कडे केली आहे, तालुक्यात गट शिक्षण अधिकारी,सहा .विस्तार अधिकारी, शालेय पोषण अधिक्षक व केंद्रप्रमुख ५ ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कामचुकार शिक्षक ह्याच गोष्टीचा सतत फायदा घेत असल्याने शालेय कामकाजाचे वेळांत शहरांत, कार्यालयांत वारंवार दिसतात. स्थानिक व्यवस्थापन समिती, पालक यांच्या माध्यमातून कमी -जास्त प्रमाणात होणाऱ्या तक्रारींकडे जबावदार आधिकारी नसल्याने दुर्लक्ष होते. ह्याच गोष्टीला आळा घालण्यासाठी शिक्षकाना असणारा ड्रेस कोड व ओळखपत्र सक्तीचे करावे अशी मागणी माजी सभापती महादेव पाटील यानी मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांचे कडे केली आहे. शिक्षक अध्यायनाचे वेळेत अन्य नको त्या कामात कसे वाहून घेतात याबाबतचे तालुक्यातील पाष्टी केंद्रातील रातीवणे शाळेतील शिक्षक नितिन माळीपरगे या शिक्षकानी म्हसळा तालुक्यात आलेल्या" पंचायत राज समितीवर" कडवी नजर कशी ठेवली होती ह्याचे डीटेल प्रिंट मुख्य कार्यकारी अधिकारी याना देऊन फर्दापाश केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्ये बजावत असताना ओळखपत्र सक्तीचं असताना पं.सं.चे अनेक कर्मचारी व शिक्षक ओळ्खपत्र व ड्रेस कोडचा वापर करीत नाहीत त्यामध्ये शिक्षकांचे प्रमाण जास्त दिसून येते.
महाराष्ट्र विधी मंडळाचे २८ आमदारांची " पंचायत राज समिती" ( P R C ) या समितीला विधान मंडळाचे सर्व हक्क
प्राप्त असतात. आशा पध्दतीने या समीतीवर कडवे लक्ष ठेवणाऱ्या तालुका शिक्षण विभागावर सभागृहात हक्क भंग आणून कायदेशीर कारवाई होऊ शकते.
-महादेव पाटील, माजी सभापती पं.स. म्हसळा.

Post a Comment