संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा गुरवार दिं .२९ नोव्हे . रोजी सकाळी ११ वा. म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे हॉल मध्ये तालुका भाजपाचे अध्यक्ष शैलेश कुमार दिनेशचंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी सहअध्यक्ष पं.स. च्या सभापती छाया म्हात्रे, सदस्य तुकाराम पाटील , नंदकुमार सावंत ,महेश पाटील, मंगेश म्हशीलकर, श्रीमती कल्पना कोठावळे, धनश्री मुंडे , जि.प. सदस्य बबन मनवे, पं.स. सदस्य व उपसभापती संदीप चाचले, तहसीलदार तथा सदस्य सचिव विरसिंग वसावे, ग.वि.अ. वाय .एम् .प्रभे, जि.प. बांधकाम विभागाचे उप- अभियंता काकुळसे, ग्रा.पा. पु.विभागाचे उप- अभियंता वाय.एम. गांगुर्डे, ता. कृ. अ.एस.एम्. भांडवलकर, म.रा.वि. वितरण कंपनीचे यादव सहदेवराव इंगळे, परिक्षेत्र वन अधिकारी के.डी. पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे , ग.शि.अ. संतोष शेडगे, वैद्यकिय अधिकारी डॉ . प्रशांत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक शहबाज जुबेर शेख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे व अन्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खालील विभागांची होती अनुपस्थिती
MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ).,खारलँड, ग्रामिण रुग्णालय, लघु पाटबंधारे, दुय्यम निबंधक, पशुधन विकास आधिकारी, राज्य परिवहन महामंडळ व सर्व बँक अशा अधिकाऱ्यांची होती अनुपस्थिती.
तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती चे अध्यक्ष , शैलेश कुमार दिनेशचंद्र पटेल व त्यांच्या सहकाऱ्यानी तालुक्यातील शिक्षण, शालेय पोषण आहार, कुपोषण, आरोग्य, पाणी टंचाई व टंचाई आराखडा , कृषी विभाग व विविध योजनां व पाणलोट विषयक होत असलेली निकृष्ट दर्जाची कामे, म.रा.वि. वि.कंपनीचे सडलेले पोल ,वन विभागा तर्फ आंबेत बाग मांडला रस्त्यावरील पांगळोली, तोंडसुरे -आगरवाडा परिसरांतील व्याघेश्वर पर्यटन या विषयी सवीस्तर चर्चा झाली.
म्हसळा नगरपंचायत झाली टार्गेट कामगिरी समाधान कारक की असमाधान कारक : अध्यक्षांचे मौन.
समन्वय व पुनर्विलोकन समिती चे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे म्हसळा शहरा जवळ रोजचे संबंध असल्याने बैठकीत अशुध्द पाणीपुरवठा, नाले सफाई, दुर्गंधी नाशक व डास प्रतिबंधक फवारणी, सुलभ सौचालये , राईट टू पी अॅक्ट नुसार मही लांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, गुरांसाठीकोंडवाडा, डंपींग ग्राऊंड मुळे दुर्गवाडी, चिराठी परीसरांत होणारी दुर्गधी वापरांत नसलेला फिल्टरेशन फ्लँट, फवारणी, बॅनरबाजीने होत असलेले शहराचे विद्रुपी करण या सर्वंच प्रश्नांची कालबध्द व योग्य अशी उत्तरे ,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या कडून मिळाली नसल्याचे अध्यक्ष पटेल यांच्या कडून सांगण्यात आले. मागील दोन ते अडीच वर्षात पंचायत समितीच्या माध्यमातून अगर मासिक सभेत छेडले न गेलेल्या विषयाना समन्वय व पुनर्विलोकन समितीमध्ये विषय छोडल्याने पटेल व त्यांच्या टिमचे कौतुक होत आहे.

Post a Comment