जनतेचे नियमानुसार काम केलेत आम्ही आभारी आहोत : आम्ही म्हसळाकर


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्रात आहे महसुली जॅमर या शिर्षका खाली सर्वत्र बातमी आली , बातमीची खातर जमा प्रभारी तहसीलदार विरसिंग वसावे यानी करून संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश दिले. बघता -बघता आपले सरकार सेवा केंद्रातून दोन दिवसांत तब्बल ३८७ दाखले लाभार्थीना दिले गेले असल्याचे समजते . यामध्ये जातीचे दाखले ३४४, उत्पन्न दाखले २३, वय राष्ट्रीयत्व आणि आधिवास प्रमाणपत्र १७, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ३ असे दाखले वाटप झाल्याचे समजते.
     महसुल विभागात. ३५० अर्ज पडून  होते व  तालुक्यातील नागरीक खेटे घालत होते या वृत्ताची तहसीलदार वसावे यानी तात्काळ दखल घेतल्याबद्दल माजी सभापती महादेव पाटील यानी वसावे यांचे कौतुक केले. महसुल विभागाने दखल घेऊन केलेले काम म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे धोरणाची अंमलबजावणी आसल्याचे पाटील यानी सांगितले. यावेळी त्यांचे समवेत खारगांव ( बु) चे सरपंच अनंत नाक्ती, सामाजिक कार्यकर्ते  प्रविण उर्फ बाबू बनकर,आगरवाडयाचे माजी सरपंच नारायण नाक्ती, हेमंत नाक्ती , सचिन मोहीते आदी  कायकर्ते होते.
      राज्यांत नागरिकाना शासनाच्या सेवा गतीमान व योग्य मुदतीत मिळाव्या यासाठी राज्य शासनाने प्रथम सेतू, महा ई सेवा केंद्र व आता आपले सरकार सेवा केंद्र उघडून ऑन लाईन गतीमान व ठराविक मुदतीत सेवा देण्याचे असुनही काही अर्ज ऑगस्ट २०१८ पासूनचे होते असे समजते.

म्हसळा Live इफेक्ट
आपला म्हसळा आपला आवाज... आपल्या बातमीची दखल घेत तहसीलदार विरसिंग वसावे यांनी संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश देत दोन दिवसांत तब्बल ३८७ दाखल्यांचं केलं वाटप..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा